शेतकऱ्याच्या मुलाचा विद्यापीठात गौरव
By admin | Published: March 19, 2017 01:27 AM2017-03-19T01:27:35+5:302017-03-19T01:27:35+5:30
येथील निखिल श्रावण परोपटे या शेतकऱ्याच्या मुलाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान मिळविले.
दाभा (पहूर) : येथील निखिल श्रावण परोपटे या शेतकऱ्याच्या मुलाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान मिळविले. विद्यापीठाचे उपकुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
रत्नकला व श्रावण हनुमंतराव परोपटे या शेतकरी दाम्पत्याने केवळ दीड एकर शेतीच्या भरवशावर मुलाला शिकविले. पोटाला पिळ देऊन मुलाची शिक्षणाची जिद्द पूर्ण केली. बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रीक शाखेचे शिक्षण घेत तो विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिला आला. महाविद्यालयातर्फे त्याला शिल्ड, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरविले. सोबतच त्याची आई रत्नकला व वडील श्रावण परोपटे यांचा महाविद्यालयाने गौरव केला. (वार्ताहर)