झाडगाव येथे ‘एक घास चिऊताईसाठी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:44+5:302021-03-15T04:37:44+5:30
झाडगाव .... राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे वृक्ष संवर्धन चमूच्या माध्यमातून पक्ष्यांना पाणी व अन्न मिळावे, यासाठी पाणवठे व अन्नाची ...
झाडगाव .... राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे वृक्ष संवर्धन चमूच्या माध्यमातून पक्ष्यांना पाणी व अन्न मिळावे, यासाठी पाणवठे व अन्नाची व्यवस्था करण्यात आली. गावात ‘एक घास चिऊताईसाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
उन्हाळ्याने अंगाची लाहीलाही होत असताना पाणी, अन्नाच्या शोधात पक्ष्यांची परवड होते. मृगाच्या पहिल्या सरीपर्यंत ती सुरू राहते. पक्ष्यांना पाणी मिळाले नाही, तर ते मृत्यू पावतात. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण वृक्ष संवर्धन चमूने घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांसाठी खाद्य व पाणी देण्यासाठी ‘एक घास चिऊताईसाठी’ हा उपक्रम उन्हाळाभर राबविण्याचा निर्णय घेतला. यात ग्रामस्थ तेलाचे पिंप, धान्य देऊन सहकार्य करीत आहेत. वस्तीच्या दूर, जिथे पक्ष्यांसाठी सुरक्षित वातावरण असते, अशा ठिकाणीही चमू पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करीत आहेत.
केवळ साहित्य लावून हे काम थांबणार नाही; तर त्यामध्ये पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही चमूने घेतली. संयोजक रूपेश रेंघे व त्यांची चमू मेहनत घेत आहे. या उपक्रमाची सुरुवात राळेगावचे विनय मुनोत, शरद केवटे, संदीप ब्राम्हणवाडे, स्वप्नील कुबडे यांनी पिंप देऊन् केली. यावेळी सरपंच बाबाराव किन्नाके, उपसरपंच रोशन कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे, हरिभाऊ भोयर, संदीप नाकाडे, मनोज केवटे, नरेंद्र केवटे, राधा देशमुख, साक्षी चौधरी, स्मिता धोटे, प्रसाद कुबडे, करण लटारे, मेहर पिंपळकर, रितेश तासलवार व गावकरी उपस्थित होते.