‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला महाप्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:00 AM2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:19+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यवतमाळमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड संकटाच्या काळात सामाजिक दायित्व निभावले. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत हे शिबिर पार पडले. दर्डानगर परिसरातील दर्डा मातोश्री सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिराचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यवतमाळमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड संकटाच्या काळात सामाजिक दायित्व निभावले. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत हे शिबिर पार पडले.
दर्डानगर परिसरातील दर्डा मातोश्री सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिराचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, माजी मंत्री आमदार संजय राठोड, आमदार ॲड. नीलय नाईक, माजी मंत्री व आमदार प्राचार्य डाॅ. अशोक उईके, उमरखेडचे आमदार व नगराध्यक्ष नामदेवराव ससाने, नगराध्यक्ष कांचनताई चाैधरी, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, संजय देशमुख, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड, सभापती विजय राठोड, सभापती जयाताई पोटे, काॅंग्रेसच्या गटनेत्या स्वातीताई येंडे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. तरंगतुषार वारे, तहसीलदार कुणाल झाल्टे, रेमण्डचे व्यवस्थापकीय संचालक नितीन श्रीवास्तव, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वनमालाताई राठोड, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चाैधरी, नगरसेवक जावेद अन्सारी, प्रा.डाॅ. प्रवीण प्रजापती, सुजित राय, प्रा.डाॅ. बबलू देशमुख, प्रा.डाॅ. अमोल देशमुख, नितीन गिरी, नितीन मिर्झापुरे, दिनेश गोगरकर, माजी नगरसेवक कैलास सुलभेवार, कमलकिशोर मिश्रा, ॲड. जयसिंह चव्हाण, यशवंत पवार, संजय शिंदे पाटील, स्वाभिमानी पक्षाचे नीरज वाघमारे, हनुमान आखाड्याचे सचिव प्रताप पारसकर, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा, प्राचार्य डाॅ. रामचंद्र तत्ववादी, प्राचार्य डाॅ. राममनोहर मिश्रा, प्राचार्य डाॅ. जेकब दास, प्राचार्य मिनी थाॅमस, प्राचार्य निहारिका प्रभूणे, मुख्याध्यापक राजेंद्र यादव, प्राचार्य डाॅ. सुप्रभा यादगीरवार, प्राचार्य अर्चना कढव, प्राचार्य अंशुला जैन, प्राचार्य वीरेंद्र तलरेजा, डाॅ. प्रमोद यादगीरवार, ॲड. अमरचंदजी दर्डा, माणिकराव भोयर, जाफर खान, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीच्या प्रमुख डाॅ.किरण भारती, डाॅ. सोनाली जक्कुलवार, डाॅ. इरफान तुघलक, समाजसेवा अधीक्षक अमर इमले, तंत्रज्ञ प्रदीप वाघमारे, अधिपरिचारक जीवन टापरे, दानिश शेख, आदर्श खडतकर, रामदास आगलावे, कोमल देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अजय कोलारकर यांनी केले.
रक्तदात्यांचे सामाजिक दायित्व
महारक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदात्यांनी सामाजिक दायित्व पार पाडले. कोरोनाची लस घेऊन ‘इतके दिवस लोटले, आता रक्तदान करता येईल का’, अशी विचारणा करून डाॅक्टरांनी होकार भरल्यानंतर अनेकांनी रक्तदान केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मंडळींनी शिबिरात सहभाग नोंदविला. एवढेच नव्हे तर महिला मंडळींनीसुद्धा रक्तदान केले. शिबिराला सुरुवात झाल्यापासूनच रक्तदात्यांनी मास्क लाऊन या शिबिरात सहभाग घेतला. शिबिराची वेळ संपेपर्यंत रक्तदाते याठिकाणी दाखल होत होते.
प्रेरणास्थळावर अभिवादन
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने शुक्रवारी प्रेरणास्थळ येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह यवतमाळकरांनी सकाळपासून अभिवादनासाठी गर्दी केली होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी यांनी केले सहकार्य
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ पब्लीक स्कूल, वीणादेवी दर्डा स्कूल, हनुमान व्यायाम शाळा प्रसारक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हिंदी पाठशाळा, ॲग्लो हिंदी हायस्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडीयम स्कूल, अमोलकचंद महाविद्यालय, हनुमान आखाडा या संस्थेतील कर्मचारी वृंदांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे गिरिष दाभाडकर, जिल्हा परिषद मॅजिक पाॅईंट ऑटो संघटना, धम्मभूमी कोटंबाचे विजय डांगे, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, विद्यार्थी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष काैस्तुभ शिर्के, यवतमाळ विधानसभा अध्यक्ष विक्की राऊत, ललित जैन, ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे, शिक्षक भारती संघटनेचे साहेबराव पवार, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे प्रवीण धाबर्डे, प्रफुल्ल कोवे, नीलेश दुमोरे, महसूल कर्मचारी संघटनेचे नंदकुमार बुटे, यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे आसाराम चव्हाण, गुरव समाज संघटनेचे प्रशांत वाघ, हमाल मापारी संघटनेचे अरविंद देशमुख, टंकलेखन व लघुलेखन संस्था संघर्ष समितीचे दिनेश हरणे, विलास देशपांडे, सुभाष यादव, आनंद गावंडे, देवकिसन शर्मा, एमआर असोसिएशन अध्यक्ष नीलेश पेन्शनवार, युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष कुणाल जतकर, अरुण ठाकूर, हिरा मिश्रा, जितेश नवाडे, जयंत गुघाणे, अमोल बोधडे यांनी सक्रीय सहकार्य केले.