वसंतराव नाईक यांना अभिवादन व लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:44 PM2019-07-01T21:44:43+5:302019-07-01T21:44:56+5:30
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे आदी उपस्थित होते.
यानंतर लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रलंबित तक्रारी संबंधित विभागाने त्वरीत निकाली काढाव्या, अशा सूचना केल्या. फासेपारधी समाज बांधवांना शासन योजनांचा लाभ देण्याचे विभागप्रमुखांना त्यांनी सांगितले.
लोकशाही दिनात एकूण ९१ तक्रारी दाखल झाल्या. मागील लोकशाही दिनी प्रलंबित तक्रारींपैकी सहा तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी आदी उपस्थित होते.