महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:21 PM2018-04-11T23:21:17+5:302018-04-11T23:21:17+5:30
महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. येथील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीनबंधू कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. येथील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीनबंधू कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रा.सुखदेवराव ढवळे, सतनामसिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, राजेंद्र डांगे, मंडळाचे अध्यक्ष देवीदास अराठे, माधुरी अराठे, माधुरी नाल्हे आदींचा समावेश होता.
यावेळी समता पर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, सचिव दीपक नगराळे, अशोक वानखडे, कवडू नगराळे, डॉ.दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, प्रा. डॉ. अरविंद कुडमेथे, नारायण थूल आदि उपस्थित होते. संचालन संजय येवतकर यांनी तर आभार अतुल सारडे यांनी मानले.
शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एन.एन. शेंडे, प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे, उमाकांत परोपटे, अरूण मेहेत्रे, भालचंद्र काळे, मधुकर चर्जन, प्रा.डॉ.सुधा खडके, संजय ठाकरे, डॉ.दिलीप खर्चे, मनोज गोरे, वैभव काळे, महेंद्र पिसे, वसंत नाल्हे, अशोक तिखे, सोहम मडघे, रमेश पांडे, नरेंद्र कावलकर, सुनयना येवसकर, विठ्ठल नागतोडे, विनोद इंगळे आदी उपस्थित होते. क्रांतीसूर्य युवा मंडळातर्फे निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दहा गाद्या भेट दिल्या. कार्यक्रमासाठी मंडळाचे सचिव राजेंद्र कठाळे, कल्पना लंगडे, मनोज गोरे, राजू मालखेडे, संदीप कोरडे आदींनी परिश्रम घेतले.
क्रांती वस्थीस्तर संघ संस्था
येथील क्रांती वस्थीस्तर संस्थेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सारिका सोनटक्के, शालीनी घायवन, बबिता वरघट, अनिता रामटेके, रमा खोब्रागडे, अश्विनी गजभिये, मंजूषा रामटेके, प्रभा गडलींग, जयश्री नेवारे, संध्या सहारे, रिता मेश्राम, रत्ना खोब्रागडे, नीता वासनिक, सविता कांबळे, शीला वाघमारे, रक्षा बनकर, महानंदा वैद्य उपस्थित होत्या.