केंद्रीय समितीने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:35 PM2018-05-16T22:35:47+5:302018-05-16T22:35:47+5:30
गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.
यावेळी माणिक कदम, दिलीप लोही, रोहन सावरकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या. त्यावर समितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठविला जाईल, असे मुख्य सचिव विजयकुमार यांनी सांगितले.
समितीत कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार, निती आयोगाचे (कृषी) डॉ.बी.गणेशराम, दिना नाथ, डीसीटीचे निर्देशक डॉ.आर.पी. सिंग, डेप्युटी डायरेक्टर ओमप्रकाश सुमन, डॉ.तरुण कुमार, डॉ.एस.आर. होलेटी, निदेशक डॉ.ए.एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वाराज यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चवाळे, तहसीलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी कैलास वानखडे, बीडीओ डॉ.मनोहर नाल्हे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, सरपंच चंद्रशेखर डंभे आदी उपस्थित होते.
मूळ प्रश्नाला बगल
गुलाबी बोंडअळी येण्याला केवळ शेतकरी कसे दोषी. शेतमालाचे भाव वारंवार का पाडले जातात. बोंडअळीची जाहीर केलेली रक्कम अद्याप का मिळाली नाही. शेतमाल विकण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो. बियाणे, किटकनाशके व रासायनिक खतांच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही. कपाशीवर बोंडअळी येणार नाही, याची कोण हमी देणार, या व इतर प्रश्नांना समिती सदस्यांनी बगल दिली.