किराणा, दूध, भाजी नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:25+5:30

‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे सर्व दिवस नियमित सकाळी ८ ते १२ या वेळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

Groceries, milk, vegetables regularly | किराणा, दूध, भाजी नियमित

किराणा, दूध, भाजी नियमित

Next
ठळक मुद्देसकाळी ८ ते १२ : दुचाकी वाहनांना परवानगी, बँकाही सकाळीच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेली दोन दिवस कडाक्याच्या उन्हात खरेदीसाठी बाहेर पडावे लागलेल्या यवतमाळकरांना पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी बुधवारी दिलासा दिला. गुरुवारपासून दररोज सकाळी ८ ते १२ या वेळात दूध, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहे. त्यासाठी दुचाकी वाहनांचा वापरही करता येणार आहे. केवळ आपल्या रहिवासी परिसरातच या वस्तूंची खरेदी करण्याचे बंधन प्रशासनाने घातले आहे.
‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे सर्व दिवस नियमित सकाळी ८ ते १२ या वेळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या काळात संबंधित दुकाने खुली राहतील. मात्र नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सक्ती आहे. या खरेदीच्या वेळात दुचाकी वाहनांवर बंदी राहणार नाही. परंतु १२ नंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी नाही. १२ नंतर दुचाकी वाहनांनाही परवानगी राहणार नाही. तसे कुठे आढळल्यास कठोर कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे. सर्व बँकांच्या वेळाही आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ८ ते १२ या वेळातच नियमित करण्यात आल्या आहे. दवाखाने, मेडिकल्स आदी अत्यावश्यक सेवांना २४ तास सुरू राहणार आहे.
भाजीपाल्यासाठी प्रशासनाने शहरातील २८ प्रभागात जागांचा शोध घेतला आहे. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे भाजी मार्केट तयार केले जाणार आहे. कुणालाही भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी जाता येणार नाही. घराजवळच्या परिसरातूनच भाजीपाला, दूध, किराणा माल खरेदी करावा. उगाच मुख्य मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, खरेदी करताना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना प्रशासनाने केल्या आहे.

पालकमंत्र्यांचा सील एरियासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
शहरातील १२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुरळीत पुरविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. प्रतिबंधित क्षेत्राला चारही बाजूंनी पोलिसांची सुरक्षा कडे लावण्यात येईल. त्यानंतर या भागात भाजीपाला, किराणा दुकान, औषधी, दूध पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. परिसरातील किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स यांच्या संपर्क क्रमांकाची यादी नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल. ज्या वस्तू लागतात, त्या फोनवरून संबंधित दुकानदाराकडे नागरिक मागतील. यादीप्रमाणे साहित्य घेऊन दुकानदाराचा माणूस संबंधित नागरिकांच्या घरापुढे हे साहित्य ठेवेल. यादी प्रमाणे पडताळणी करून लगेच त्या नागरिकाला संबंधित दुकानदाराकडे पैसे देता येईल. यामध्ये कुणाचाही कुणाशी संपर्क येणार नाही व नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडणार नाही, असा अ‍ॅक्शन प्लॅन पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनापुढे ठेवला. त्याच्या अंमलबजावणीचे निर्देशही प्रशासनाला दिल्याचे सांगितले.

Web Title: Groceries, milk, vegetables regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.