राष्ट्रवादीचा गटनेता अखेर बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:24 PM2018-07-02T22:24:52+5:302018-07-02T22:25:09+5:30

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेते पद बदलविण्यात आले आहे. आता बाळा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील नवीन गटनेते बनले आहे. ६१ सदस्यीय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले होते.

The group leader of NCP finally changed | राष्ट्रवादीचा गटनेता अखेर बदलला

राष्ट्रवादीचा गटनेता अखेर बदलला

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सभापती पदावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेते पद बदलविण्यात आले आहे. आता बाळा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील नवीन गटनेते बनले आहे.
६१ सदस्यीय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले होते. यात सर्वाधिक १० सदस्य पुसद, उमरखेड व महागाव परिसरातील होते. केवळ निमिष मानकर हेच एकमेव सदस्य पांढरकवडा तालुक्यातील विजयी झाले होते. पुसद विभागातून सर्वाधिक सदस्य निवडून आल्यानंतरही निमिष मानकर यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांची बांधकाम सभापती म्हणून निवड झाली. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या उर्वरित दहा सदस्यांमध्ये धुसूपूस सुरु होती. अखेर या दहा सदस्यांनी गटनेता बदलविण्याचा प्रस्ताव थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
जिल्हाधिकाºयांनी प्रस्तावावरील दहाही सदस्यांच्या स्वाक्षºया जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी पाठविल्या. या स्वाक्षऱ्यांची खातरजमा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता बाळा पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेत त्यांनी गटनेता व सदस्यांची नावे जाहीर केली आहे.

Web Title: The group leader of NCP finally changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.