होरपळलेले शेतकरी प्रशासनाच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:43 PM2019-07-25T21:43:05+5:302019-07-25T21:44:02+5:30

निसर्गाच्या कोपाचा पहिला फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाविना होरपळलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी शेतशिवाराचे वास्तव मांडले. जूनमध्ये एकच पाऊस आला आणि आता गायब झाला.

Growing farmers at the door of administration | होरपळलेले शेतकरी प्रशासनाच्या दारी

होरपळलेले शेतकरी प्रशासनाच्या दारी

googlenewsNext
ठळक मुद्देएकच पाऊस आला अन् गायब झाला : पऱ्हाटी गेली, सोयाबीन करपले, तूर जळाली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाच्या कोपाचा पहिला फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाविना होरपळलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी शेतशिवाराचे वास्तव मांडले. जूनमध्ये एकच पाऊस आला आणि आता गायब झाला. त्यामुळे पऱ्हाटी गेली, सोयाबीन करपले, तूरही जळाली, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून अधिकारीही गहीवरले.
बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, अल्लीपूर, मरळापूर, कृष्णापूर, पिंप्री, इंदिरानगर, झपाटखेड आणि नायगावातील शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव धेतली. यावेळी पावसाअभावी करपणाºया पिकांचे दु:ख जिल्हा प्रशासनापुढे मांडले. डोळ्यादेखत पऱ्हाटी, सोयाबीन, तूर, आणि इतर पीक करपत आहेत. या पिकांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. या गंभीर प्रकाराची कृषी विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. हातात असलेली सर्व जमापुंजी शेतशिवारात लावली. आता हातात काहीच उरले नाही. अशा स्थितीत वरूणराजाने दडी मारल्याने दु:खाला पारावार उरला नाही, असे दु:ख शेतकऱ्यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनामार्फत हे दु:ख मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शेतकरी आले होते.
या भागामध्ये जून महिन्यात दोन तास पाऊस बरसला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. तेव्हापासून या भागात पाऊसच पडला नाही. आता शेतातले पीक करपले आहेत. जनावरांची वैरण संपली आहे. नवीन चारा तयारच झाला नाही. यामुळे जनावरांची देखभाल करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याची घोषणा झाली. मात्र या गावातील शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नव्याने कर्जही उपलब्ध झाले नाही. गतवर्षी राज्य शासनाने तूर आणि हरभऱ्यासाठी क्विंटलला हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. अनुदानाचे पैसे केवळ ३ ते ४ शेतकऱ्यांच्याच हातात पडले. इतरांचे काय झाले, कोणालाच ठाऊक नाही. गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या. २०१८-१९ मधील तर-हरभऱ्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकºयांनी केली.
यावेळी ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय गुगलिया, राजेंद्र गुगलिया, संजय राऊत, तेजस वसुले, अरूण वेळूकर, प्रमोद शिरभाते, गजानन ठाकरे, संतोष लोटकरे, विजय वाकेकर, नवीन खिवसरा, पुरूषोत्तम शिरभाते, मिलिंद पडोळे, रामचंद्र गुगलिया, प्रफुल्ल टिकले, संतोष कृष्णाके आदींसह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.

पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट, अतिरिक्त ४० हजार क्विंटल बियाण्याची मागणी

अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाची पेरणी उलटत आहे. पिके संकटात सापडली आहे. हलक्या जमिनीतील पिके करपत आहे. परिणामी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी अतिरिक्त ४० हजार क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १५ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीची दाट शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने आयुक्त कार्यालयाकडे तूर आणि मका या अतिरिक्त बियाण्याची मागणी केली आहे. आयुक्त कार्यालयाकडे तूर्तास मका आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. या बियाण्याची आॅगस्टपर्यंत लागवड करता येणार आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत ते उगवण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना किमान माफक पीक घेणे शक्य होणार आहे.

Web Title: Growing farmers at the door of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.