लोकजागृती मंचकडून मदतीच्या ‘जीआर’ची होळी

By admin | Published: January 10, 2016 03:00 AM2016-01-10T03:00:07+5:302016-01-10T03:00:07+5:30

संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. या स्थितीत राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्याला केवळ पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

Growth of 'Gr' Gratified from Public awareness campaign | लोकजागृती मंचकडून मदतीच्या ‘जीआर’ची होळी

लोकजागृती मंचकडून मदतीच्या ‘जीआर’ची होळी

Next

यवतमाळ : संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. या स्थितीत राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्याला केवळ पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या प्रकाराचा घाटंजी येथील लोकजागृती मंचने निषेध नोंदविला. यावेळी बसस्थानक चौकात शेतकऱ्याच्या माथी एक रूपया लावून ‘जीआर’ची होळी करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. युती सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या फोटोंना हार घालून प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. यावेळी साहेबराव पवार, हेमंत कांबळे, प्रदीप डंभारे, घनश्याम अत्रे, तुळशीराम आडे, अरूण ठाकूर, योगेश धानोरकर, राजू चौधरी, गुणवंत मासूळकर, बंडू खडसे, वासूदेव राठोड, रमेश गोडे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Growth of 'Gr' Gratified from Public awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.