‘झेडपी’ सदस्यांचे निधीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:28 PM2018-12-29T23:28:09+5:302018-12-29T23:29:08+5:30

विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी वाढवावा. एका सदस्याची किमान ३५ लाखांची कामे मंजूर करावी, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शनिवारी पालकमंत्र्यांना साकडे घातले.

Guardian Minister for funding ZP members | ‘झेडपी’ सदस्यांचे निधीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

‘झेडपी’ सदस्यांचे निधीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी वाढवावा. एका सदस्याची किमान ३५ लाखांची कामे मंजूर करावी, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शनिवारी पालकमंत्र्यांना साकडे घातले.
हा निधी पांदण रस्त्यांसाठी राखीव ठेवावा, असे मत पालकमंत्री मदन येरावार यांनी सभागृहात व्यक्त केले. यासोबतच जनसुविधेमधून जिल्हा परिषद सदस्यांसाठी पाच कोटी राखीव ठेवण्यात आले. ६१ सदस्यांना हा निधी प्रत्येकी ८ लाख २० हजार रूपयेच येणार आहे. प्रत्यक्षात प्रत्येक सदस्याने ३५ लाखांची कामे सुचविली होती. यामुळे नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पालकमंत्री मदन येरावार यांना साकडे घातले गेले. यावेळी पालकमंत्र्यांनी सदस्यांना २५ लाख रूपयांपर्यंतची कामे देण्याबाबत आश्वस्त केले. स्वाती येंडे, वैशाली राठोड, पावनी कल्यमवार, रेणू संजय शिंदे, रुख्मिणी उकंडे, कालिंदा पवार, सुमित्रा राठोड, सरिता जाधव, मिनाक्षी बोलेनवार, श्रीधर मोहोड, गजानन बेजंकीवार, विजय राठोड उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister for funding ZP members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.