पालकमंत्री, ऊर्जा राज्यमंत्र्यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण

By admin | Published: September 19, 2016 01:12 AM2016-09-19T01:12:09+5:302016-09-19T01:31:25+5:30

पालकमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण असून या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असतो,

Guardian Minister, Minister of State for Energy, Full Knowledge of Patient Problems | पालकमंत्री, ऊर्जा राज्यमंत्र्यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण

पालकमंत्री, ऊर्जा राज्यमंत्र्यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण

Next

विजय दर्डा यांचे प्रशंसोद्गार : अतिदक्षता कक्षाची पाहणी
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण असून या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असतो, असे प्रशंसोद्गार माजी खासदार विजय दर्डा यांनी काढले.
‘मेडिकल’मध्ये रविवारी पार पडलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. विजय दर्डा म्हणाले, या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी व्हावी यासाठी मी आणि दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद यांच्याकडे पाठपुरावा केला. आता यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर झाले असून रुग्णालयाचे बांधकामही सुरू झाले आहे. या रुग्णालयात पुरेशा सुविधा, नर्सेस, डॉक्टर्स मिळावे यासाठी अभ्यागत मंडळाचा अध्यक्ष म्हणून सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री मदन येरावार या दोघांना तळागाळातील प्रश्नांची जाणीव आहे. मंत्री नसतानासुद्धा त्यांचे रुग्णसेवेकडे पूर्ण लक्ष होते, अशा शब्दात दर्डा यांनी या दोनही मंत्र्यांचा गौरव केला.
रुग्णालयात नव्याने साकारण्यात येत असलेल्या अतिदक्षता कक्षाची मान्यवरांनी पाहणी केली. येथे असलेल्या सोईसुविधा व कक्षाचे स्वरूप कसे राहील, याची माहिती अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी दिली.
यावेळी डॉ. बाळकृष्ण बांगडे, डॉ.रोहिदास चव्हाण, नगरसेवक अमन निर्बाण, कैलास सुलभेवार, सुभाष यादव, जगजितसिंग ओबेरॉय, विजय कोटेचा, प्रदीप डंभारे, आनंद गावंडे, मनोज रायचुरा, देवकिसन शर्मा, जयंत झाडे, हिरा मिश्रा, राहुल राऊत, गोपाल अग्रवाल, राजेश ठाकरे, घनश्याम अत्रे तसेच रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.डॉ.ज्योती जाधव यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)

रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण
गर्भाशयाची शस्त्रक्रिया रखडल्याची तक्रार घेऊन एक महिला कार्यक्रमस्थळी विजय दर्डा व ना. मदन येरावार यांच्याकडे आली. तेव्हाच एक नातेवाईक रुग्णासाठी व्हेन्टीलेटरच उपलब्ध नसल्याचे सांगून ते उपलब्ध करून द्यावे, अशी गयावया करू लागला. यावर विजय दर्डा यांनी अधिष्ठाता डॉ. राठोड यांना तत्काळ व्यवस्था करण्याची सूचना दिली.
अशी आहे रुग्णवाहिका
राज्यातील अद्यावत असलेल्यांपैकी एक अशी ही रुग्णवाहिका आहे. त्यासाठी विजय दर्डा यांनी खासदार निधीतून ३५ लाख रुपये दिले होते. या रुग्णवाहिकेमध्ये जीवनावश्यक प्रणालीसह सर्वच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. यात डीफ्रीबीलेटर, नेबुलाईझर, इलेक्ट्रीक सक्शन मशीन, मल्टीपॅरामॉनिटर, इन्फूजन सिरिंग पंप, पोर्टेबल व्हेन्टीलेटर यांचा समावेश आहे. याशिवाय रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर, एक नर्स आणि पुरेसा औषधी साठा ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Guardian Minister, Minister of State for Energy, Full Knowledge of Patient Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.