आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:00 PM2017-09-22T23:00:40+5:302017-09-22T23:00:54+5:30
जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती. याचीच धास्ती घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव रचल्याचा आरोप बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी येथे जाहीर सभेत केला.
विविध आदिवासी संघटनांच्यावतीने यवतमाळात महामोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. तत्पूर्वी पोस्टल मैदानात आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय सेवेत बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरींचा लाभ घेणाºयावर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. अशा बोगस आदिवासी असलेल्या एक लाख ९५ हजार शासकीय सेवेतील कर्मचाºयांना सरकार पाठीशी घालत आहे. आमदार राजू तोडसाम यांनी हाच मुद्दा घेऊन राज्य विधिमंडळात भूमिका घेतली. आदिवासींच्या हक्कासाठी लढणाºया आमदारांचे स्थानिक पालकमंत्र्याकडून खच्चीकरण केले जात असल्याा आरोप या सभेत करण्यात आला. मग्रूर कंत्राटदारला स्थानिक पालकमंत्र्यांची चिथावणी असल्याचाही दावा मडावी यांनी केला. सभेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांनी हा आदिवासींच्या अस्मितेवरील हल्ला असल्याचे सांगितले. यापूर्वी परधान समाज संघटनेचे दिनेश मडावी, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, किरण कुमरे, रूपेश राठोड, राजीव चांदेकर, शेखर मडावी, ज्ञानेश्वर उईके, गुलाबराव कनाके, माधुरी अंजीकर, मनीषा तिरणकर, रेखा कनाके आदी आदिवासी समाज संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हा मोर्चा पाचकंदील चौक ते बथस्थानक चौकमार्गे एलआयसी चौकात पोहोचला. विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
या मोर्चामध्ये आदिवासी उलगुलान कृती समिती, आदिवासी संघर्ष समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, परधान समाज संघटना, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना, आदिवासी बहुजन महासंघ, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, गोंडवाना मित्र मंडळ, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन बंजारा सेना, बिरसा ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.