‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर
By admin | Published: August 24, 2016 01:02 AM2016-08-24T01:02:25+5:302016-08-24T01:02:25+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग आणि टेक्सटाईल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे सदर शिबिर घेण्यात आले.
मार्गदर्शक म्हणून इस्कॉन नागपूरचे भगिरथ दास लाभले होते. त्यांनी १२ वर्षे फार्मास्युटिकल कंपनीत व्यवस्थापक पदावर काम केले असून १९९४ पासून इस्कॉनमध्ये आहेत. ‘मास्टर मार्इंड बिहार्इंड मिस्टेरिअस युनिव्हर्स’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात नवनिर्मिती करताना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, हे त्यांनी प्रामुख्याने सांगितले. कुठल्याही नवीन गोष्टीचा विकास करायचा असेल तर विचार करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. हे करत असतानाच ज्याप्रमाणे निसर्गात विधात्याने काही अलौकिक गोष्टींची निर्मिती केली, त्याचप्रमाणे आपण तयार केलेली प्रत्येक गोष्ट कशी अलौकिक होईल, याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
शिबिरासाठी इस्कॉनचे रोहित जयपुरिया यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, ‘टेसा’ समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, सागर धोटे, क्षितिज झलके, उमेश पाटील, नितेश धारिया, हर्षल सर्मित, सपना गुबरे, वर्षा राठोड, लोमेश नारखेडे, युगा बोबडे, सायली देव, तेजस कापसे, दीपाली मुंडलिक, शुभम अवझाडे आदींची उपस्थिती होती. संचालन स्वप्नजा राऊत हिने केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)