‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:12 PM2019-01-21T22:12:07+5:302019-01-21T22:12:30+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अॅन्ड कम्युनिकेशन स्कील’ याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य तथा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. दीपक कुलकर्णी लाभले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अॅन्ड कम्युनिकेशन स्कील’ याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य तथा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. दीपक कुलकर्णी लाभले होते.
यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. आर. एस. तत्ववादी, विभाग प्रमुख डॉ. गणेश काकड, यवतमाळ येथील महिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्रा. चारूशीला गरद, प्रा. अनघा गाढवे, प्रा. शीतल वनकर उपस्थित होते.
मार्गदर्शनात प्रा.कुलकर्णी यांनी सकारात्मक दृष्टिकोन आयुष्यात कसा उपयोगी आहे, यशस्वी लोकांच्या जीवनात किती महत्वपूर्ण ठरला हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. यावेळी त्यांनी संवादशैलीचे विविध पैलू सप्रात्यक्षिक सांगितले.
शिबिरप्रसंगी ‘जेडीआयईटी’सह महिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. गणेश काकड यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संदीप सोनी, डॉ. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा.मोनाली इंगोले, प्रा.राम सावंत, प्रा. सूरज पाटील, अमोल गुल्हाने, श्याम केळकर, विनोद चौरे आदींनी पुढाकार घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. आर.एस. तत्ववादी यांनी आयोजकांचे कौतुक केले.