टेक्सटाईल उद्योगातील घडामोडींवर मार्गदर्शन
By admin | Published: September 19, 2015 02:31 AM2015-09-19T02:31:05+5:302015-09-19T02:31:05+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात टेक्सटाईल उद्योगातील नवीन घडामोडी, ....
‘जेडीआयईटी’ : ‘टेसा’ क्लबचा पुढाकार
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात टेक्सटाईल उद्योगातील नवीन घडामोडी, तंत्रज्ञानाचा विकास, नोकरी आणि व्यवसाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
‘टेक्सटाईल डे’चे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली. व्यासपीठावर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शुभम श्रीवास्तव, प्रियंका सरिया, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले आदी उपस्थित होते.
टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील गुणवत्ता प्राप्त आणि नामांकित पदावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शुभम श्रीवास्तव, प्रियंका सरिया प्रवीण दीक्षित, मुक्तेश्वर दीक्षित, श्रद्धा दुधे, वैष्णवी इंगळेकर, मीनल जयस्वाल या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
टेक्सटाईल डे साजरा करण्यासाठी या शाखेतील विद्यार्थी पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होेत. विद्यार्थिनींनी नववारी, पैठणी, तर विद्यार्थ्यांनी कुर्ता, पयजामा आणि फेटा परिधान करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यशस्वीतेसाठी टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, सुरभी परळीकर, विक्रमजित सिंग, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी मयूर उजवणे, दीपाली राठोड, बिपीन पांडे, जुबेर पठाण, गजानन कदम, पूजा महल्ले, नगमा खान, श्याम शेंदूरकर, प्रियंका सानप, उमेश पाटील, युगा बोबडे, सायली देव, तृप्ती पाठक, क्षितिज झळके, दीपाली मुंडलिक आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)