‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन

By admin | Published: April 2, 2017 12:23 AM2017-04-02T00:23:37+5:302017-04-02T00:23:37+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

Guide to textile issues in 'JediT' | ‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन

Next

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण पटेल व डॉ. एस.आर. वेंगसरकर लाभले होते.
डॉ. वेंगसरकर यांनी लीड्स विद्यापीठ युके इंग्लंड येथून १९६६ मध्ये टेक्सटाईल अभियांत्रिकीत पीएच.डी. संपादन केली. २३ वर्षे कॉलिको फायबर व २० वर्षे झोनित फायबर बडोदा (गुजरात) येथे चिफ एक्झीक्युटिव्ह (सीईओ) म्हणून काम पाहिले. २५ पेक्षा अधिक देशांमध्ये टेक्सटाईल उद्योगासंबंधी कार्यात सहभाग घेतला. त्यांचे २० पेक्षा अधिक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीस आॅफ पॉलीप्रोपेलीन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी १९७० च्या दशकात सर्वप्रथम पॉलीप्रोपेलीन उद्योग भारतात चालू करण्यासंबंधी मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात त्यांनी अप्लीकेशन आॅफ फायबर या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. प्रवीण पटेल यांनी आयआयटी दिल्ली येथून जीयो टेक्सटाईल या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. त्यांना संशोधन औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राचा तीन वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांचे ४० पेक्षा अधिक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. मेडिटेक्स या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांना अमेरिकेत निमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेत त्यांनी अ‍ॅडव्हास स्पिनिंग टेक्नॉलॉजी आणि टेक्नीकल टेक्सटाईल या विषयावर मार्गदर्शन केले.
संचालन स्वप्नजा राऊत यांनी, तर आभार प्रा. प्रशांत रहांगडाले यांनी मानले. कार्यशाळेला प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, उमेश पाटील, निकेश धारिया, प्रणौती म्हैस्कर, लोमेश नारखेडे, उमेश पाटील, तेजस कापसे, दीपाली मुंडलिक, शुभम अवझाडे आदींनी पुढाकार घेतला.
यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: Guide to textile issues in 'JediT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.