‘जेडीआयईटी’त वीज सुरक्षेवर मार्गदर्शन
By admin | Published: April 16, 2017 01:06 AM2017-04-16T01:06:11+5:302017-04-16T01:06:11+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत सुरक्षिततेवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत सुरक्षिततेवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विद्युत कंपनीचे अभियंता नितीन पानतावणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी क्लबव्दारे हा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्युत सुरक्षितता व दक्षता या विषयावर नितीन पानतावणे यांनी मार्गदर्शन करताना घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावशाली भूसम्पार्कन करण्याचे विविध उपाय यावर माहिती दिली. दैनंदिन जीवनात विद्युत उपकरणे हाताळताना दक्षता घेतल्यास संभाव अपघात आणि हानी टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. विद्युत सुरक्षितता व दक्षतेबद्दल जनमानसात जागरूकतेसाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. पंकज पंडित, स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंगचे समन्वयक प्रा. सारंग खडतरे, प्रा. गुरूपाल गायधने, प्रा. शिल्पा लिंगावार, प्रा. अक्षय शिरभाते, प्रा. आकाश गोफणे यांच्यासह विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. संचालन व आभार दीक्षा मुळे यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी नेहा भोंगाडे, उत्कर्षा बडे, हेमंत गुल्हाने, धनंजय वाघचोरे, अतुल डाकारे, हितेश बोबडे, कुणाल किन्हेकर, अर्पण नागराळे आदींनी पुढाकार घेतला. यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)