कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 10:11 PM2017-11-01T22:11:25+5:302017-11-01T22:11:36+5:30

बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे.

'Gulabi Gang' on Kadashi Bondel | कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

Next
ठळक मुद्देफवारणीलाही जुमानेना : प्रत्येक बोंडात अळी, वणी उपविभागात प्रकोप, शेतकºयांचा वैताग

संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे. वणी तालुक्यासह मारेगाव व झरी तालुक्यात कपाशीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा वैताग वाढला आहे. गंभीर बाब ही की, कोणत्याही फवारणीला या अळ्या जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषधे विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद बनले आहे. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे पिक घेतले जाते. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. वणी उपविभागात फवारणीमुळे विषबाधेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्यात. त्यामुळे शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळेनासे झाले. त्यातच कृषी विक्रेत्यांनी कारवाईच्या भितीने फवारणीची औैषधे विकणेच बंद केले. त्यात २ नोव्हेंबरपासून कृषी विक्रेत्यांचा संप सुरू होत आहे. परिणामी आता काय करावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.
वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून पाहिल्यानंतर त्यात गुलाबी अळी असल्याचे दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरून काढत आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकºयांवर संकटांची मालिका
एकीकडे रोगांच्या प्रादुर्भावाने पिके धोक्यात आली असताना त्यावर फवारणी करण्यासाठी औषधे मिळत नाहीत. औैषधे मिळाली तर विषबाधेच्या भितीने फवारणीसाठी मजूर मिळत नाहीत. या संकटाशी शेतकरी झुंजत असताना वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केले आहे. पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. सिंचनाअभावी ही पिके वाळण्याची शक्यता आहे. पिके हाती येण्याच्या स्थितीत असताना रानडुक्कर, रोह्यांचे कळप शेतात शिरून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. संकटांच्या या मालिकेने शेतकरी खचून गेला आहे. गेल्या २० वर्षांत अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही, असे निंबाळा येथील शेतकरी राजेंद्र आसेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोंडअळीच्या त्रासाने दोन एकर पºहाटीवर फिरविला नांगर
सहा एकरातील कपाशीच्या प्रत्येकच बोंडात गुलाबी अळीचा प्रकोप झाला. त्यामुळे वैतागलेल्या एका शेतकºयाने बुधवारी सहापैकी दोन एकरातील कपाशीवर नांगर फिरविला. देवीदास पोरजलवार असे सदर शेतकºयाचे नाव असून तो झरी तालुक्यातील पाटण येथील रहिवासी आहे. पाटण गावालगतच त्याचे शेत आहे. आणखी एक एकरमधील कपाशीचे पीक काढून टाकणार असल्याचे देवीदासने ‘लोकमत’ला सांगितले. यंदा बोंडअळीमुळे एकरी केवळ चार क्विंटल कापूस झाला. बोंडअळीमुळे पुढे झाडांना कापूस फुटेल याची कोणतीच शाश्वती नसल्याने आपण कपाशीचे पिक काढून फेकल्याचे तो म्हणाला.

Web Title: 'Gulabi Gang' on Kadashi Bondel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.