नागपूरकडे निघालेला २० लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Published: May 29, 2016 02:37 AM2016-05-29T02:37:52+5:302016-05-29T02:37:52+5:30

हैदराबाद येथून चोरट्या मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या गुटख्याचा ट्रक मारेगाव पोलिसांनी पकडून तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला.

Gurkha seized from Nagpur worth Rs 20 lakh | नागपूरकडे निघालेला २० लाखांचा गुटखा जप्त

नागपूरकडे निघालेला २० लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

पांढरदेवी जंगलात ट्रक पकडला : मारेगाव पोलिसांची कारवाई
मारेगाव : हैदराबाद येथून चोरट्या मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या गुटख्याचा ट्रक मारेगाव पोलिसांनी पकडून तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला. वन विभागाने दिलेल्या माहितीवरून शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिसांनी पांढरदेवी जंगलात ही कारवाई पार पाडली.
आयशर कंपनीचा ट्रक (एम.पी.२८-टी.ई.९३८४) हा पांढरदेवी जंगलात संशयास्पद स्थितीत उभा होता. वन कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक व वाहकाकडे सहज चौकशी केली. त्या ट्रकमध्ये ‘नजर’ कंपनीचा गुटखा असून तो नागपूरला नेत असल्याचे सांगितले. वनरक्षक रामेश्वर मेंढले यांनी लगेच याबाबत वन विभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ मारेगाव पोलिसांना कळविले.
मारेगावचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोसे यांनी त्वरित पथकासह घटनास्थळ गाठले. तेथून चालक म. ईब्राहिम म. गुलाब रसूल (२८) व वाहक सैय्यद नईम सय्यद हुसैन (२६) दोघेही रा. हैदराबाद यांना ताब्यात घेऊन गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केला. यावेळी यवतमाळ येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. सायंकाळी उशिरा त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या गुटख्याला महाराष्ट्रात बंदी असून त्याची किंमत अंदाजे २० लाख रूपयांच्या वर असल्याचे सांगितले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरूच होती. या ट्रकचा मालक हैदराबाद येथील असल्याची माहिती आहे.
एका संघटनेच्या युवकांनी केला ट्रकचा पाठलाग
हैदराबाद येथून हा ट्रक नागपूरकडे निघाला असताना एका कारने त्याचा पाठलाग केला. कारमध्ये एका संघटनेचे युवक होते. त्यांनी ट्रक चालक व वाहकाला मारहाण करून ट्रक मालकाला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे घाबरलेल्या चालक व वाहकाने राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक वाईमार्गे जळका जंगलात आणून उभा केला होता. चालक व वाहकाला मारहाण करणारे ते युवक कोण व ती कार कोणाच्या मालकीची, याचा पोलीस शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gurkha seized from Nagpur worth Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.