मतदार जनजागृती अभियानात गुरूकुलचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:30+5:302021-08-20T04:48:30+5:30
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनातर्फे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनातर्फे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार सुरेश कवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नायब तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सिद्धी पोगाकवार, अभीश्री गुंडावार, वंशिका पंड्या, समृद्धी बोगावार, कस्तुरी देशपांडे, पूर्वा लांबट, ऋतुजा वटे, संस्कृती भेंडाळे, पियूशा भेंडाळे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिक्षकांमध्ये संतोष डोंगरे, सुषमा नारलावार, पूजा निर्गुडवार यांचा सहभाग होता. या शाळेने विद्यार्थ्यांकरिता ‘वीर गाथा’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांची गोष्ट, देशभक्तीपर गीत, माझा आवडता क्रांतिकारक, मी सैनिक बोलतोय, स्वातंत्र्य लढ्यात वीरांचे योगदान व क्रांतिकारकांचे चित्र व गोष्ट इत्यादी उपक्रम देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या घरूनच वरील विषयावर एक तीन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपापल्या वर्ग शिक्षकांना पाठविला. या उपक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाळेचे संचालक, प्राचार्य विजय देशपांडे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.