यवतमाळमध्ये पोलीस व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडला ७१ लाखांचा गुटखा
By सुरेंद्र राऊत | Published: November 25, 2022 07:45 AM2022-11-25T07:45:56+5:302022-11-25T07:46:31+5:30
यवतमाळ: जिल्ह्यातील बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क चालविले जात होते. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात ...
यवतमाळ:
जिल्ह्यातील बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क चालविले जात होते. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात केला जात होता. किराणा व्यवसायाच्या आड गुटखा तस्करी सुरू होती. याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व अन्नसुरक्षा अधिकारी यांनी धाड टाकून गुरुवारी तब्बल 71 लाखाचा गुटखा जप्त केला. ही जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
VIDEO: यवतमाळमधील बाभुळगाव येथून तब्बल ७१ लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. pic.twitter.com/MWNc7yfobN
— Lokmat (@lokmat) November 25, 2022
गुटका किंग ऐफाज मेनन वय 30 हा प्रतिबंधित गुटखा वितरण करण्याचे काम करत होता. त्याने ग्रामीण भागातील किराणा दुकानातून गुटखा विक्री चे नेटवर्क उभे केले आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षातच त्यांनी हे साम्राज्य तयार केले. महिन्याकाठी दीड ते दोन कोटींची उलाढाल केली जात होती. याची गोपनीय माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख प्रदीप परदेशी, सहाय्यक निरीक्षक विवेक देशमुख, सहायक निरीक्षक सागर भारस्कर, जमादार अजय डोळे, निलेश राठोड, विनोद राठोड, निखिल मडसे, महेश नाईक, रजनीकांत मडावी यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, घनश्याम दनदे यांनी ही कारवाई केली.
किराणा गोदामात लपविलेला गुटखा टेम्पोत भरून पोलीस ठाण्यात आणण्यात आला. 71 लाख किमतीच्या गुटख्याची मोठा ढीग लागला. ही जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.