लोहारा विभागात गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:00 AM2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:02+5:30

दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे.

Guttaranga in the Lohara section | लोहारा विभागात गटारगंगा

लोहारा विभागात गटारगंगा

Next
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाऱ्या प्रभागांमध्ये गटारगंगा तयार झाल्या आहेत. या विभागात येणाºया जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ही समस्या आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव जीवघेणा ठरत आहे.
दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाºया लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे. परंतु अगदी प्रवेशद्वारावरच भल्यामोठ्या खड्ड्यात सांडपाणी साचलेले आहे. यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. एकवीरा चौकात एका सदनिकेचे सांडपाणी सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावरून वाहते. तकलादू उपाय याठिकाणी केले जातात. विशेष म्हणजे या भागात सांडपाणी काढून देण्यासाठी मोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. सांडपाणी त्याठिकाणी सोडण्यासाठी आवश्यक तो उपाय केला गेलेला नाही. याच मार्गावर तिरूपतीनगराकडे जाणाºया वळणावर सांडपाण्यात अक्षरश: पिण्याच्या पाण्याचा वॉल आहे. हा गंभीर प्रश्न सोडविण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही.
लोहारा बायपासवर असलेल्या अहिल्यानगरी, राऊतनगर, मैथिलीनगर या भागातील गटारांना अक्षरश: तळ्याचे स्वरूप आलेले आहे. लोकांच्या अगदी घराला लागून सांडपाणी थोपले गेले आहे. वसाहती निर्माण होण्यापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. नागरिकांनी वैयक्तिकरित्या शोषखड्डे तयार करून पाणी जागीच मुरविण्याचा केलेला प्रयत्नही फार काळ टिकलेला नाही. नगरपरिषदेकडून नाल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. दिला तरी अतिशय तोकडा असतो. दुसरीकडे गटार योजना येत असल्याने नाल्या बांधायच्या नाही, असे धोरणच असल्याचे सांगितले जाते. भूमिगत गटार योजना पूर्ण होईपर्यंत असाच त्रास सहन करायचा काय, हा नागरिकांचा प्रश्न आहे.
वॉर्डाशी संबंधित काही नगरसेवकांना या समस्यांशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. समस्या मांडल्यानंतर कितीतरी दिवसपर्यंत दखल घेतली जात नाही. प्रभागाचे प्रतिनिधित्व करताना लोकांचे प्रश्न सोडविले जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे.

भूमिगत गटार योजना नाही
यवतमाळ शहरात राबविल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेतूनही लोहारा विभागातील जवळपास प्रभागांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळाले नाही. वास्तविक या भागात गटारांनी कहर केला आहे. दारव्हा रोडवर असलेल्या काही वसाहतींमधील सांडपाणी रेल्वे रुळाच्या बाजूला सोडून देण्यात आले आहे. प्रामुख्याने लोहारा बायपासवर असलेल्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची समस्या मोठी आहे. मात्र याविषयी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. या भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी जवळच मोठा नाला आहे. त्यादृष्टीने इतर उपाययोजनांची गरज आहे.

खड्डामय रस्ते
नगरपरिषदेच्या लोहारा विभागात येणाºया अनेक भागात खड्डामय रस्त्यांची मालिका सुरू झाली आहे. तीन ते चार फुटांचा पसारा असलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. डागडुजी करण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. नगरसेवकही गंभीर नाही.

Web Title: Guttaranga in the Lohara section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.