जिल्हा परिषद अधिकाºयांकडून सभागृह, सदस्यांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:34 AM2017-09-21T00:34:00+5:302017-09-21T00:34:13+5:30

गेल्या १ सप्टेंबरच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनंतर अधिकाºयांनी सभागृह व सदस्यांची बदनामी केल्याचा आरोप खुद्द अध्यक्षांनीच केला आहे.

Hall of condemnation of Zilla Parishad officers; | जिल्हा परिषद अधिकाºयांकडून सभागृह, सदस्यांची बदनामी

जिल्हा परिषद अधिकाºयांकडून सभागृह, सदस्यांची बदनामी

Next
ठळक मुद्देअध्यक्षांचा आरोप : आयुक्तांकडे कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या १ सप्टेंबरच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनंतर अधिकाºयांनी सभागृह व सदस्यांची बदनामी केल्याचा आरोप खुद्द अध्यक्षांनीच केला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी, असा सामना रंगला होता. सभेत सदस्यांनी लोकशाही पद्धतीने विकास कामांबाबत चर्चा केली. कुठल्याही अधिकाºयांबाबत पूर्वग्रहदूषित भावनेने चर्चा केली नाही. असंवैधानिक शब्दांचा वापर अथवा अपशब्द उच्चारला नाही, असा दावा अध्यक्षांनी केला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्षांच्या निर्देशानुसार खाते प्रमुखांनी उभे राहून उत्तर देणे अभिप्रेत आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यास कोणताही सदस्य अधिकाºयांना धारेवर धरत नाही, असा आपला अनुभव असल्याचे अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी म्हटले आहे.
सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडल्यानंतर सदस्यांनी प्रश्न विचारले म्हणून सर्व अधिकाºयांनी संघटित होऊन आपल्याला निवेदन दिल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले. हे निवेदन म्हणजे एकप्रकारे सभागृहालाच आव्हान असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादा ठराव नियमबाह्य असेल, तर अधिकाºयांनी त्यावर आपले मत देणे अपेक्षित असते. मात्र तसे कोणतेही मत अधिकाºयांनी नोंदविले नाही, असा आरोपही त्यांनी केला. सभागृहात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याऐवजी अधिकाºयांनी सभागृहालाच आव्हान दिल्याचा आरोप अध्यक्षांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
वरिष्ठांची परवानगी नाही
अधिकाºयांनी वरिष्ठांची परवानगी न घेताच सभागृह आणि सदस्यांबाबत तक्रार सादर केल्याने जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याचा आरोप अध्यक्षांनी केला. अधिकाºयांचे हे वर्तन नियमबाह्य आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाºयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष माधुरी आडे यांनी आयुक्तांकडे केली. यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी विरूद्ध लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद अद्याप धुमसत असल्याचे स्पष्ट झाले. या वादातूनच सीईओ रजेवर तर गेले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Hall of condemnation of Zilla Parishad officers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.