खुल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:31 PM2018-12-26T21:31:00+5:302018-12-26T21:31:13+5:30

शहरातील लोहारा बायपास मार्गालगत असलेल्या सानेगुरूजीनगरातील खुल्या जागेत धार्मिक अतिक्रमण होते. यावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. या अतिक्रमणावर नगरपरिषदेने बुधवारी पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवत जमीनदोस्त केले.

Hammer on open encroachment | खुल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा

खुल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा

Next
ठळक मुद्देलोहारा बायपास : सानेगुरुजी नगरात चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील लोहारा बायपास मार्गालगत असलेल्या सानेगुरूजीनगरातील खुल्या जागेत धार्मिक अतिक्रमण होते. यावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. या अतिक्रमणावर नगरपरिषदेने बुधवारी पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवत जमीनदोस्त केले.
कोणत्याही वसाहतीमधील आरक्षित खुल्या भूखंडामध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. सानेगुरूजीनगर भाग एक व भाग दोन येथेसुध्दा खुल्या जागेत अतिक्रमण करण्यावरून दोन गटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली होती. सातत्याने परस्परांविरोधात तक्रारी सुरू होत्या. अखेर पालिका मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दोन्ही खुल्या जागेतील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ग्रामीण ठाणेदार उत्तम चव्हाण, लोहाराचे ठाणेदार प्रकाश सोनोने, अवधुतवाडीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दीडशे पोलीस कर्मचारी, राखीव दलाच्या दोन तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या. नगरपरिषदेचे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख डी.एम.मेश्राम, अधीक्षक मनोहर गुल्हाने, अभियंता गजानन वातिले, आरोग्य निरीक्षक प्रफुल जनबंधू, लता गोंधळे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिसरात नागरिकांचा मोठा जमाव होता.
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांतता ठेवली. या कारवाईने अनेक दिवसांपासून येथे निर्माण झालेला धार्मिक तणाव कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Hammer on open encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.