२४ धार्मिकस्थळांवर चालणार हातोडा
By admin | Published: January 28, 2017 02:21 AM2017-01-28T02:21:54+5:302017-01-28T02:21:54+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यवतमाळ शहरातील २४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला जाणार
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यवतमाळ शहरातील २४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला जाणार असून यासाठी २९ जानेवारीपासून मोहीम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद क्षेत्रातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून धार्मिकस्थळांच्या अतिक्रमणाचा अहवाल गोळा केला. याबाबत आक्षेप व त्यावरील सुनावणी जिल्हास्तरावर पार पडली. आता २००९ नंतर अतिक्रमित असलेल्या सर्वच धार्मिक स्थळांचे उच्चाटन केले जाणार आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात अशी २४ धार्मिक स्थळे असून त्यांच्यावर हातोडा चालविण्याची कारवाई रविवारपासून केली जाणार आहे. नगरपरिषदेने महसूल व पोलीस दलाची मदत मागितली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी आढावा घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)