सोनखास येथे हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:25 PM2018-03-06T23:25:32+5:302018-03-06T23:25:32+5:30
नेर तालुक्यातील सोनखास व हेटी ही गावे गटग्रामपंचायत असून तेथील ग्रामस्थांना मागील ५० वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाईन लोकमत
सोनखास : नेर तालुक्यातील सोनखास व हेटी ही गावे गटग्रामपंचायत असून तेथील ग्रामस्थांना मागील ५० वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकारी व पदाधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही गावे पाणीटंचाईच्या वनव्यात होरपळली जात आहे. दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यापासून सोनखास(हेटी) येथे पाणीटंचाईला सुरुवात होते. हेटी येथे गवळी समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. प्रत्येक कुटुंबाकडे ३० ते ४० जनावरे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने हे कुटुंब जनावरांना घेऊन पाण्याच्या शोधात गाव सोडून जातात. टंचाई संपल्यानंतर गावात परततात.
या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. संपूर्ण रात्रभर पाण्यासाठी धावपळ सुरू असते. गावशिवारात असलेल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच या परिसरात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी दूधदुभत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या या गावातील जनावरांच्या विक्रीमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.