हरिदास दुबे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 09:56 PM2018-03-25T21:56:54+5:302018-03-25T21:56:54+5:30
बौद्ध महासभेचे सचिव, भारत संचार निगमचे माजी अभियंता, जय भीम ज्येष्ठ नागरिक मैत्रेय संघाचे सदस्य हरिदास दुबे यांना एन.के. धोटे व मित्र परिवारातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : बौद्ध महासभेचे सचिव, भारत संचार निगमचे माजी अभियंता, जय भीम ज्येष्ठ नागरिक मैत्रेय संघाचे सदस्य हरिदास दुबे यांना एन.के. धोटे व मित्र परिवारातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी एन.के. धोटे होते. याप्रसंगी बुद्धिस्ट पेन्शनर्सचे अध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे, काशीनाथ ब्राह्मणे, एन.के. धोटे, डॉ. ललित बोरकर आदींनी हरिदास दुबे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. प्रा. जयदेव वानखेडे यांच्या ‘बुद्धा मेसेज फॉर मॅरेजेबल यूथ’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हरिदास दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला चित्तरंजन वंजारे, एम.एन. राऊत, तात्याराव मोरे, प्रा. शेंद्रे, प्रा.डॉ. रोशन शेंडे, महेंद्र कांबळे, भीमराव कांबळे, गोपाळराव लोणारे, शरद निरंजने, नागदिवे, एन.टी. भगत, गंगाधर नांदेकर, मनोहर वरघट, कुंदा बोरकर, डॉ. राखी शेंडे, अरमान शेंडे आदी उपस्थित होते.