आधारला १० वर्षे झाली का?... तर करा अपडेट... खास शिबिर 

By अविनाश साबापुरे | Published: June 3, 2023 04:49 PM2023-06-03T16:49:44+5:302023-06-03T16:52:38+5:30

यवतमाळातील नागरिकांसाठी सोय : पाच जूनपासून आठ ठिकाणी आयोजन

Has Aadhaar been 10 years old?... so update... Organizing a special support camp in Yavatmal | आधारला १० वर्षे झाली का?... तर करा अपडेट... खास शिबिर 

आधारला १० वर्षे झाली का?... तर करा अपडेट... खास शिबिर 

googlenewsNext

यवतमाळ : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. हे काम तातडीने पूर्ण करता यावे यासाठी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

अनेकांनी आधार कार्ड काढून आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या कार्डला आता बदललेला पत्ता, नावातील बदल, जन्मतारीख किंवा बायोमेट्रिक आदीसंदर्भातील बदल अद्ययावत करण्याची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मे रोजी असे आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार डाॅ. योगेश देशमुख यांनी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिर आयोजित करण्यासाठी ३० मे रोजी आदेश काढले आहेत.

त्यानुसार शहरातील एकंदर आठ ठिकाणी हे शिबिर येत्या ५ जूनपासून घेतले जाणार आहे. शिबिराच्या ठिकाणी संबंधित आधार केंद्र चालकांना आपला आधार संच घेऊन लोकांना सेवा देण्याबाबत तहसीलदारांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील रहिवाशांना आपल्या परिसरातच आधार कार्ड अपडेट करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

अशी असतील आधार अपडेशन शिबिरे
दिनांक : ठिकाण : आधार केंद्र चालक
५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वडगाव : अमित जोशी
५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, लोहारा : निखिल महल्ले
७ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वाघापूर : निखिल महल्ले
७ जून : जि. प. शाळा, पिंपळगाव : पवन भेंडे
९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, मोहा : पवन भेंडे
९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, भोसा : हरीओम गाडगे
११ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, उमरसरा : नवाज अहमद इस्माईल खान
१२ जून : नगर भवन, यवतमाळ : नवाज अहमद इस्माईल खान

Web Title: Has Aadhaar been 10 years old?... so update... Organizing a special support camp in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.