पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 05:00 AM2022-07-15T05:00:00+5:302022-07-15T05:00:11+5:30

आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे.

Havoc of Rain; Billions hit | पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस झाला असून, उमरखेड, महागावसह वणी तालुक्यालाही पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. 
आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ ३८.७, बाभूळगाव १२.७, कळंब ७.८, दारव्हा ३७.२, दिग्रस ३५.४, नेर ३८.२, पुसद ४०.६, वणी ४९.६, मारेगाव २१.१, झरी जामणी २८.१, केळापूर २५.६, घाटंजी ३८ तर राळेगाव तालुक्यात १२.६ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०५ मिमी एवढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४.४ टक्के पाऊस झाला आहे. 
 

अडाण प्रकल्पातूनही पाणी सोडणार

- यवतमाळ : अधूरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन प्रकल्पाच्या सहा दरवाजातून १५० क्युमेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी १ च्या सुमारास आणखी चार दरवाजे २५ सेमीने उघडण्यात येऊन प्रकल्पातून ४०० क्युमेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राहण्याचे आवाहन केले आहे. 
- सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ३७८.२७ मीटर असून या प्रकल्पात ४५.४१ टक्के जलाशय साठा झाला आहे. मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२२ अखेर जलाशय पातळी ३७९.८५ मीटर ६३ टक्केपर्यंत भरावयाचा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील २४ तासात प्रकल्पातील येव्यानुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याचे अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग दारव्हातर्फे कळविण्यात आले आहे.

 

Web Title: Havoc of Rain; Billions hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.