नगराध्यक्षांची कंत्राटदारास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:54 PM2018-05-31T23:54:46+5:302018-05-31T23:54:46+5:30

येथील नगरपालिकेतील एका शासकीय कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

The head of the municipal corporation beat the contractor | नगराध्यक्षांची कंत्राटदारास मारहाण

नगराध्यक्षांची कंत्राटदारास मारहाण

Next
ठळक मुद्देवणी पोलिसांकडे तक्रार : तारेंद्र बोर्र्डेंविरूद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील नगरपालिकेतील एका शासकीय कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी संबंधित कंत्राटदाराने रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुनिल माधवराव पारखी असे तक्रारकर्त्या शासकीय कंत्राटदाराचे नाव आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सुनिल पारखी हे गांधी चौैक परिसरात नळजोडणीचे काम सुरू असताना त्या परिसरातीलच काही व्यापाऱ्यांनी या कामाला विरोध केला. त्यातून या व्यापाºयांसोबत पारखी यांचा वाद झाला. या वादमुळे मनस्थिती खराब झाल्याने ते तेथून घरी निघून गेले. दरम्यान, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तेथे पोहचले. त्यांनी काय प्रकार घडला म्हणून चौैकशी केली व लगेच सुनिल पारखी यांना दूरध्वनी करून गांधी चौैकात बोलाविले व तेथे आल्यानंतर ‘तू नागरिकांशी वाद का घातला’ असे म्हणून शिविगाळ सुरू केली. धमकी देत बोर्डे यांनी कानशिलात लगावली. यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर पारखी घराकडे निघून गेले. बुधवारी रात्री त्यांनी या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याविरुद्ध भादंवि ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वणी शहरात अनेक ठिकाणी सध्या विकास कामे होत असून त्यातून मतभेद वाढले आहेत. यातूनच वादावादीचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जाते.
नळजोडणीचे काम अवैैध- तारेंद्र बोर्डे
नगरपालिकेशी संबंधित कुणीही नागरिकांशी मग्रुरी करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही. मुळात सदर कंत्राटदाराला कामाची कोणतीही आॅर्डर देण्यात आली नव्हती. तरीही तो काम करीत होता. त्याची निश्चितपणे चौैकशी केली जाईल. मारहाण केल्याचा आरोप धादांत खोटा असून केवळ मला बदनाम करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे. जनतेसाठी माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल झाले तरी मला त्याची पर्वा नाही, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The head of the municipal corporation beat the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.