महिलांसाठी आरोग्य शिबिर
By admin | Published: March 12, 2016 02:49 AM2016-03-12T02:49:30+5:302016-03-12T02:49:30+5:30
नाबार्ड, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता आणि ऋण परामर्श केंद्र आणि अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला.
यवतमाळ : नाबार्ड, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता आणि ऋण परामर्श केंद्र आणि अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, समाज कल्याण सभापती लता खांदवे, संचालक एस. बी. मिटकरी, नाबार्डचे प्रविण मेश्राम, समुपदेशक विजय ढोक, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, मुंगसाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगिता घुईखेडकर, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष अलका कोथळे उपस्थित होत्या. यानिमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. डॉ. मंगेश हातगावकर, डॉ. नितीन कोथळे, डॉ. प्रविण राखुंडे, डॉ. कल्पना बैस यांनी तपासणी केली. कार्यक्रमात लासिनाच्या सरपंच अलका कांबळे, रत्ना पंधराम, आरती ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम मुठ्ठी अनाज या योजनेतून गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सुधा राठी, गोदावरी मल्टीस्टेट बँकेच्या व्यवस्थापक वंदना ठवकार उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी चंद्रमणी पाटील, आमिर हुसैन, प्रमोद कोथळे, अजय देशमुख, ज्ञानेश्वर मात्रे, नरेश गंगशेट्टीवार यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)