कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Published: June 2, 2016 12:16 AM2016-06-02T00:16:17+5:302016-06-02T00:16:17+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन येथील एस.टी. बसस्थानकात साजरा करण्यात आला.

Health Check-up camp for the employees | कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

Next

एसटीचा वर्धापन दिन : वणी बसस्थानकाची आकर्षक सजावट
वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन येथील एस.टी. बसस्थानकात साजरा करण्यात आला. यानिमित्त आगारातील वाहक व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याहस्ते बुधवारी केक कापून वर्धापन दिन सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी आगार प्रमुख एन.आर. धारगावे, सहायक वाहतूक अधीक्षक लता मुळेवार, वरिष्ठ लिपीक तानाजी पाऊणकर, कामगार अधिकारी एस.एस. भोसले प्रमुख उपस्थित होते. यानिमित्त बसस्थानकाची आकर्षक सजावट करण्यात आली. रांगोळीतून एस.टी.चे काढलेले चित्र प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. आगार व्यवस्थापक धारगावे यांनी प्रास्ताविकातून चालक व वाहकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्ता योजनेची माहिती देऊन त्याचे वितरण केले. आगारातील चालक व वाहकांची रक्तदाब, शर्करा, हिमोग्लोबीन, डोळे व इतर आजारांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक गोफणे, अरूण विधाते, अक्षय तुगनायत, निता बदुकले, अनिता मुजगेवार, सरोज देशमुख, समुपदेशक प्रकाश काळे व एस.टी. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Health Check-up camp for the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.