मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी

By admin | Published: May 25, 2016 12:04 AM2016-05-25T00:04:41+5:302016-05-25T00:04:41+5:30

गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. शिवाय स्थानिक पातळीवर ..

Health check up for doctors in Mumbai, Pune | मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी

मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी

Next

महाआरोग्य शिबिर : मोफत शस्त्रक्रिया, ३०० डॉक्टरांचा ताफा तैनात
यवतमाळ : गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. शिवाय स्थानिक पातळीवर शस्त्रक्रियेची सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना वेदनादायी जीवन जगावे लागते. सामान्यांची ही समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांसह सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
या शिबिराच्या तयारीचा आढावा येथील बचत भवनात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड राठोड, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, विमल चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपरिषदांचे अध्यक्ष, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर शिबिर पालकमंत्र्यांच्या पुढाकारात आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि बळीराजा चेतना अभियानाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण कराव्या लागणार आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी केले.
बैठकीला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, सामाजिक संघटनांचे प्राचार्य शंकरराव सांगळे, डॉ.नारायण मेहरे, डॉ.सी.बी. अग्रवाल, देविदास गोपलाणी, राजू पडगिलवार, जलालुद्दीन गिलाणी, शंतनू शेटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

औषधी, भोजन व्यवस्था मोफत
शिबिरात दाखल रुग्णांना औषधे, आवश्यक साहित्य आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली जाणार आहे. यापूर्वी राज्यांमध्ये झालेल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये हजारोच्या संख्येने रुग्ण सहभागी झाल्याचा अनुभव पाहता त्या पध्दतीची व्यवस्था केली जाणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी २९ मे ते ४ जूनदरम्यान नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.
एकाच वेळी ३०० डॉक्टर रूग्ण तपासणार
ग्रामीण व तालुकास्तरावर रुग्णांची तपासणी होऊन यवतमाळ येथे ५ जूनला आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी ३०० डॉक्टरांची फौज राहणार आहे. ५० पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर्स एकट्या मुंबईहून येणार आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथून येणाऱ्या डॉक्टरांची संख्या १०० इतकी राहणार आहे. स्थानिक शासकीय व खासगी २०० असे एकूण ३०० डॉक्टर शिबिराच्या दिवशी रुग्णांची तपासणी करतील.

Web Title: Health check up for doctors in Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.