कोरोनाबाधित गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:22+5:30
मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही चार गावे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सील करण्यात आली. या चार गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्यसेवक, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी १४ दिवस सेवा देऊन तपासणी केली.
मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. या दरम्यान या चारही गावात आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकाच्या चमूने घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली.
रूई येथे ९, मरसूळ व दत्तापूर येथे प्रत्येकी ३ तर इसापूर येथे ७ जणांची चमू १४ दिवस कार्यरत होती. या चमूने कोरोनाबाधित गावात १४ दिवस सेवा दिली. या सेवेबद्दल या सर्वांचा इसापूर येथील शाळेत गौरव करून ग्रामसेवक आत्माराम माळवे यांनी आभार मानले.
गाव समितीचे सहकार्य
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णदास बानोत यांच्या मार्गदर्शनात डॉ.संजय जाधव, आरोग्य सेवक डी.एन. धुळे, गणेश माहुरे, शिवाजी श्रीरामे, सेविका शोभा बरडे यांनी सेवा दिली. डॉ.कपील मुनेश्वर, डॉ.प्रशांत जाधव, रचना जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका यांनी ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण केले. त्यांना संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आदींनी सहकार्य केले.