स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गावात आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:47 AM2021-08-21T04:47:35+5:302021-08-21T04:47:35+5:30

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आजाराच्या भीतीने दुर्गम भागातील ग्रामस्थ आरोग्य उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी घाबरतात. त्याऐवजी वैदू किवा बोगस ...

Health services in the village through NGOs | स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गावात आरोग्यसेवा

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गावात आरोग्यसेवा

Next

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आजाराच्या भीतीने दुर्गम भागातील ग्रामस्थ आरोग्य उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी घाबरतात. त्याऐवजी वैदू किवा बोगस डॉक्टरकडे उपचार घेतात. यातून दुर्गम भागात आरोग्याच्या समस्या वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून या संस्थांनी तीन तालुक्यातील १२ गावांतून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी या १२ गावात एशर स्वयंसेवकांची निवड करून त्यांना आरोग्य तपासणीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामार्फत रुग्णांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या वजन काटा, थर्मल गन, बी.पी. मशीन, ऑक्सिमीटर आदी वैद्यकीय उपकरणाचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून गावामध्ये टेली मेडिसिन संकल्पनेच्या माध्यमातून गावातच आरोग्यसेवा पुरविल्या जाणार आहे. मुख्याध्यापक सुरेश नहाते, डी.एम. पोल्हे यांच्याहस्ते किटचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन उत्तम लडके यांनी केले. प्रास्ताविक किशोर चांदेकर यांनी केले, तर आभार गणेश माणुसमारे यांनी मानले.

Web Title: Health services in the village through NGOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.