पांढरकवडाची आरोग्य यंत्रणा आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:22 PM2018-03-28T23:22:37+5:302018-03-28T23:22:37+5:30

तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात अनेक आरोग्य केंद्र आहेत. परंतु जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे.

Healthy health care sick | पांढरकवडाची आरोग्य यंत्रणा आजारी

पांढरकवडाची आरोग्य यंत्रणा आजारी

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग झोपेत : रूग्णांना करावे लागते खासगी रूग्णालयात रेफर

ऑनलाईन लोकमत
पांढरकवडा : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात अनेक आरोग्य केंद्र आहेत. परंतु जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या रूग्णालयाचा कारभार चालत आहे. पंरतु याकडे जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नाही. तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर कर्मचारीच रूग्णांवर औषधोपचार करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पांढरकवडा येथे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयासह तालुक्यात पाटणबोरी, पहापळ, अर्ली, रूंझा, करंजी व खैरगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ४४ आरोग्य उपकेंद्र आहेत. ही रूग्णालये कागदोपत्री सुसज्ज दिसत असली तरी या आरोग्य केंद्रातून ग्रामस्थांना पाहिजे तशी योग्य आरोग्य सेवा मिळतच नाही. काही आरोग्य केंद्रात तर नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. अनेकदा वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसतात. ते आपला खासगी व्यवसाय सांभाळून फावला वेळ या प्राथमिक आरोग्य केंद्राला देतात. काही आरोग्य केंद्रामध्ये तर वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवसच आपली सेवा देतात. त्यांच्या गैरहजेरीत या आरोग्य केंद्राचा कारभार चतुर्थ श्रेणी कर्मचारी व परीचारीकाच सांभाळतात. एखादे आरोग्य केंद्र सोडले, तर बहुतांश ठिकाणचे आरोग्य केंद्राचे कर्मचारी तात्पुरता उपचार करून रूग्णांना इतर ठिकाणी रेफर केले जाते. गंभीर रूग्ण दाखलच करून घेतल्या जात नाही. बाह्यरूग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना तासन्तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्राकडे वरिष्ठांचा कानाडोळा
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर वरिष्ठ अधिकाºयांचे नियंत्रण नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाºयांचे पद तयार करण्यात आले आहे. परंतु हे पदही केवळ शोभेचेच बनले आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या बैठका जिल्हा मुख्यालयी यवतमाळ येथेच होतात. जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या नियंत्रणातच तालुक्याची आरोग्य यंत्रणा असते. परंतु जिल्हा आरोग्य अधिकाºयाचे या आरोग्य केंद्रावर नियंत्रणच नाही.

Web Title: Healthy health care sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.