धक्कादायक; बाईचा आवाज ऐकून डॉक्टर हुरळले.. आणि चक्क दोन कोटींना गंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 08:56 PM2021-09-04T20:56:04+5:302021-09-04T21:01:55+5:30

Yawatmal सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नावाने दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून मौल्यवान दागिन्यांसह तब्बल दोन कोटी रुपये लाटल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

Hearing the woman's voice, the doctor was deceived .. and two crores were wasted | धक्कादायक; बाईचा आवाज ऐकून डॉक्टर हुरळले.. आणि चक्क दोन कोटींना गंडले

धक्कादायक; बाईचा आवाज ऐकून डॉक्टर हुरळले.. आणि चक्क दोन कोटींना गंडले

Next
ठळक मुद्देसोशल मीडियातून मैत्री करणारी स्त्री निघाली पुरुषच

 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नावाने दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून मौल्यवान दागिन्यांसह तब्बल दोन कोटी रुपये लाटल्याची धक्कादायक घटना पुढे आली असून याप्रकरणी यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीतील २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक कोटी ७२ लाख रुपयांसह दागिने जप्त करण्यात आले आहेत. (Hearing the woman's voice, the doctor was deceived .. and two crores were wasted)

यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्लीमधील नामांकित डॉक्टरला दोन कोटी रुपयाला फसविल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे प्राप्त झाली होती. पोलिसांनी अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारी ही स्त्री नव्हे तर पुरुषच असल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली येथील या डॉक्टरशी महिला असल्याचे भासवून सदर तरुणाने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. जवळीकता निर्माण झाल्यानंतर या तरुणाने डॉक्टरकडे मोबाईल, अंगठीसह दागिन्यांची मागणी केली. डॉक्टरांनीही या वस्तू भेट म्हणून दिल्यानंतर या तरुणाने बहिणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. बहिणीला सोडविण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांना सांगितले.

डाॅक्टर दिल्ली येथून यवतमाळ येथे आले. येथील एका हॉटेलच्या बाहेर समर नामक व्यक्तीस त्यांनी रक्कम सोपविली. त्यानंतर डॉक्टर दिल्लीला परतल्यानंतर पुन्हा चार लाखांची रक्कम बँकेच्या अकाऊंटवर मागविली. ही रक्कम मिळताच बँक अकाऊंट अचानक बंद झाले. डॉक्टरांना फसल्याचा संशय आल्याने त्यांनी थेट यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, डॉक्टरांची फसवणूक करणारी महिला नव्हे तर पुरुष असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलीस पथकाने अरुणोदय सोसायटीतील एका घरी किरायाने राहणाऱ्या इसमावर धाड टाकली असता संदेश अनिल मानकर यानेच महिला असल्याचे भासवून डॉक्टरला फसविल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मानकर याच्या घरातून एक कोटी ७२ लाख सहा हजार १९८ रुपयांसह चार लाखांचे सोन्याचे दागिने तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १ कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उद्योगपती असल्याचे भासवून डॉक्टरशी वाढविली जवळीकता

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला असल्याचे भासवून तरुणाने डॉक्टरांशी संवाद सुरू केला. जवळीकता निर्माण झाल्यानंतर आपले विविध ठिकाणी मोठे उद्योग आहेत तसेच मी आर्थिकदृष्ट्या संपन्न घराण्यातील असल्याचे भासविले. दुबईत हॉटेल असून त्यानिमित्ताने दुबईसह विविध देशांमध्ये आपला वावर असल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी विश्वास ठेवल्यानंतर बहिणीच्या अपहरणाचा बनाव करून महिला असल्याचे भासविणाऱ्या या तरुणाने डॉक्टरला तब्बल दोन कोटींचा गंडा घातला.

 

Web Title: Hearing the woman's voice, the doctor was deceived .. and two crores were wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.