यवतमाळ येथे जोरदार अवकाळी पाऊस; पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:29 AM2021-03-23T11:29:17+5:302021-03-23T11:29:38+5:30

Yawatmal News सोमवारी रात्रीपासून यवतमाळ आणि उर्वरित जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडत आहे.  

Heavy unseasonal rain at Yavatmal | यवतमाळ येथे जोरदार अवकाळी पाऊस; पिकांना फटका

यवतमाळ येथे जोरदार अवकाळी पाऊस; पिकांना फटका

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सोमवारी रात्रीपासून यवतमाळ आणि उर्वरित जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडत आहे.  यवतमाळ तालुक्यात  काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले. सध्या शेतात गहू , हरभरा, आंबा  या पिकांना फटका बसला आहे.. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले.

पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याचं जीव टांगणीला लागलेल आहे. खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला त्यात रब्बी पिकावर भिस्त होती ती मागील अवकाळी पावसाने व ढगाळ  वातावरणाने हिरावले. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगला अडचणीत आला आहे..बदलत्या हवामानाने हवेत गारवा पसरल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याच हवामानाने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सुद्धा आहे .

Web Title: Heavy unseasonal rain at Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस