कोरोना बळींचा उच्चांक; 37 जण नेले, 810 पछाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:00 AM2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:02+5:30

सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

The height of the corona victims; 37 carried, 810 chased | कोरोना बळींचा उच्चांक; 37 जण नेले, 810 पछाडले

कोरोना बळींचा उच्चांक; 37 जण नेले, 810 पछाडले

Next
ठळक मुद्देअंत्यविधींची दाटी : सर्वाधिक २३ मृत्यू यवतमाळचे, ५७२० ॲक्टिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे मन हेलावून, हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने दररोज अंत्यविधी पाहण्याचे दुर्दैवी दिवस आणले आहेत. रोज जीव घेणाऱ्या कोरोनाने सोमवारी मृत्यूसंख्येचा उच्चांक करीत तब्बल ३७ जणांचा बळी घेतला.  त्यातील २२ मृतक हे एकट्या यवतमाळातील आहेत. तर दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ८१० जणांना बाधित करून या विषाणूने आपल्या जबड्यात ओढले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा ९२३ झाला असून सध्या ५७२० ॲक्टिव्ह रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरू आहे.
सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे. पुसद येथील ५५ वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला, वणी तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ४० वर्षीय पुरुष व ४२, ५९ वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ५० वर्षीय महिला, आर्णी तालुक्यातील ५७ वर्षीय महिला, केळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, कळंब येथील ४९ वर्षीय महिला आणि घाटंजी तालुक्यातील ७५ वर्षीय महिला आदींचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ५१ वर्षीय महिला, उमरखेड येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
  सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ८१० जणांमध्ये ४७५ पुरुष आणि ३३५ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३०० रुग्ण, पांढरकवडा १५२, उमरखेड ७५, दिग्रस ६९, पुसद ३३, वणी ३१, कळंब २९, नेर २८, बाभूळगाव २१, घाटंजी १२, मारेगाव ११, राळेगाव ११, महागाव १०, दारव्हा १०, आर्णी ९, झरीजामणी १ आणि इतर शहरातील ८ रुग्ण आहे. 
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार, सोमवारी ४६१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१० पॉझिटिव्ह आले. तर ३८०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५७२० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी २७७० जण रुग्णालयात भरती आहेत. तर २९५० जण गृह विलगीकरणात रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार ४५७ झाली आहे. गेल्या २४ तासात ८९२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३४ हजार ८१४ आहे. तर जिल्ह्यात एकूण ९२३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८७ असून मृत्युदर २.२३ आहे.
आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३८९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ३०९५ अप्राप्त आहेत. तसेच ३ लाख ४ हजार ८३७ नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले. 

यवतमाळच्या मोक्षधामात धगधगल्या २१ चिता

 कोरोना बळी वाढत असल्याने बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनावरच येवून पडत आहे. सोमवारी यवतमाळच्या पांढरकवडा रोड स्थित मोक्षधामात तब्बल २१ पार्थिवांना भडाग्नी देण्यात आला. स्मशानातील जागा आणि मृतदेहांची संख्या पाहून अंत्यविधीचे तीन टप्प्यात नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ८ तर तिसऱ्या टप्प्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात धगधगणाऱ्या चिता पाहून मोक्षधामाचे वातावरणही गहिवरले. 

 

Web Title: The height of the corona victims; 37 carried, 810 chased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.