पुसदमधील वीज बळींच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:52 AM2021-07-07T04:52:13+5:302021-07-07T04:52:13+5:30
दोन जणांचा झाला होता मृत्यू : प्रत्येकी चार लाखांचे अर्थसाहाय्य (फोटो) पुसद : वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील दोन ...
दोन जणांचा झाला होता मृत्यू : प्रत्येकी चार लाखांचे अर्थसाहाय्य
(फोटो)
पुसद : वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील दोन जणांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे ८ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते व तहसीलदार अशोक गीते यांच्या पुढाकाराने ही मदत देण्यात आली. पुसद तालुक्यात ७ जून रोजी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यावेळी शेतात काम करीत असताना तालुक्यातील पारध येथील खुशाल बाबूसिंग राठोड (३५) यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत ९ जून रोजी तालुक्यातील जमशेटपूर येथील समीक्षा पिंटू जाधव (१४) ही मुलगी शेतात काम करीत असताना तिच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मृतकाच्या नातेवाइकांना स्थानिक तहसील कार्यालयात आमदार इंद्रनील नाईक, तहसीलदार अशोक गीते यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे एकूण ८ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश शासकीय नियमानुसार देण्यात आले. याप्रसंगी मृतक खुशाल यांची पत्नी अंजली राठोड, मृतक समीक्षाचे वडील पिंटू जाधव व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.