आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:44 AM2021-04-02T04:44:09+5:302021-04-02T04:44:09+5:30

पुसद : 'नाम' फाऊंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. उमरखेड तालुक्यातील जनूना येथील युवा शेतकरी ...

Helping a suicidal farmer family | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत

Next

पुसद : 'नाम' फाऊंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. उमरखेड तालुक्यातील जनूना येथील युवा शेतकरी संदीप शेषराव राठोड (३२) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली होती. कुटुंबातील कर्ता गेल्याने व दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विधवा पत्नीवर पडल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला.

या आपत्तीग्रस्त कुटुंबाची माहिती नामचे स्वप्निल देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवून नामचे विदर्भ व खान्देश समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मृताच्या पत्नीला १५ हजारांचा धनादेश दिला.

यावेळी नाम फाऊंडेशनचे पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्निल देशमुख, दीपक ठाकरे, अनिल दामोधर, सचिन तामस्कर उपस्थित होते.

Web Title: Helping a suicidal farmer family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.