इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:00 AM2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:03+5:30

आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला.  नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता नाही. आरोपी शुभमने हत्या करण्यापूर्वीच मद्य प्राशन केले. घटनास्थळी दारूची रिकामे बॉटल आढळून आली. शुभमने दगडाने आस्थाच्या चेहऱ्यावर प्रहार केले.

Her status on Instagram became the last; Suspicion kills faith | इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून

इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहारा एमआयडीसीमध्ये प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेतील आस्था शिष्यवृत्तीचा अर्ज भरायला जाते असे सांगून गुरुवारी सकाळी १० वाजता घराबाहेर पडली. तिने ओटीपीकरिता आईचा मोबाइलही स्वत:कडे मागून  घेतला. या घटनेनंतर मुलीच्या खुनाचे वृत्त तुंबडे कुटुंबीयांना कळताच कुणाचा विश्वास बसेना. आस्थाची आई तर जागेवरच कोसळली. काय कसे कुठे असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घोंगावत होते. 
आस्था सुरेश तुंबडे (१८)  ही बी.कॉम. प्रथम वर्षाला बाबाजी दाते महाविद्यालयात शिकायला होती. आस्था होतकरू असल्याने गुरुमाऊली सोसायटी उमरसरातील  आपल्या घरीच लहान मुलांच्या शिकवणीसुद्धा घेत होती. आस्थाचा स्वभाव मोकळा व ती निडर म्हणून कुटुंबात ओळखली जात होती. बुधवारी आस्था कुटुंबीयांसह राळेगाव येथे गेली. रात्री परत आल्यानंतर तिने गुरुवारी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र बॅगेत घेतले. जाताना आईला तिचा मोबाइल मागितला व स्वत:च्या स्कुटीने घराबाहेर पडली. मुलगी अर्ज भरायला गेली असाच कुटुंबीयांचा समज होता. मात्र दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आस्थाच्या आईला तिच्या खुनाची माहिती देण्यात आली. याचा प्रचंड धक्का बसला. 
आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला.  नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता नाही. आरोपी शुभमने हत्या करण्यापूर्वीच मद्य प्राशन केले. घटनास्थळी दारूची रिकामे बॉटल आढळून आली. शुभमने दगडाने आस्थाच्या चेहऱ्यावर प्रहार केले. तिचा जबडा पूर्णत: तुटला. दात तोंडाबाहेर पडले होते. नंतर शुभमने जवळ असलेल्या ब्लेडने हाताची नस कापली, स्वत:चा गळाही चिरला. मात्र यात शुभम जखमी झाला. त्याची जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांच्या वेळीच नजरेत आल्याने शुभमला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. 

तडफडत असताना गुन्ह्याची कबुली 
- आस्था व शुभमच्या प्रेमात संशयाचे भूत शिरले. यातूनच शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला. याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिल्याचे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी माध्यमांना सांगितले. आस्थाचे दुसऱ्या कुणाशी संबंध असल्याचा संशय आल्याने शुभमने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. 

काही तासातच झाली खुनाच्या घटनेची उकल 
- खुनाच्या घटनेची माहिती मिळताच लोहारा पाेलीस घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे व त्यांच्या पथकाने या घटनेची काही तासातच उकल केली. सुरुवातीला प्रेमीयुगुलाला लुटण्याच्या उद्देशाने तर हल्ला झाला नाही ना असा अंदाज होता. मात्र नंतर घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे तसेच जखमीने दिलेली कबुली यावरून प्रेमप्रकरणातूनच हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले.

 

Web Title: Her status on Instagram became the last; Suspicion kills faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.