हायमास्टचे २० लाखांचे बिल थकले; महागाव नगरपंचायतीच वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 02:32 PM2021-09-24T14:32:31+5:302021-09-24T16:44:26+5:30
महागाव नगरपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे तीन लाख रुपये भरणे बाकी आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
यवतमाळ : महागाव नगरपंचायतीने वीजबिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा व लाईट बंद आहे.
नगरपंचायत प्रशासनाचा प्रभार पुसदवरून हाकला जात आहे. प्रभारी अधिकाऱ्याला महागावकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे समस्या वाढतच आहे. दोन दिवसांपासून पाणी व लाईटसाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
हायमास्ट लाईटचे २० लाखांचे बिल थकले आहे. तसेच पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे तीन लाख रुपये भरणे बाकी आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. बहुतांश विकास कामे ठप्प पडलेली असून घनकचरा व्यवस्थापनासह अन्य कामकाज प्रचंड रेंगाळले आहे.