हायवेमुळे 350 गावांचे अर्थकारण बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:34+5:30
गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावाचा विकास आणि रस्त्यांचे जाळे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या काळात रस्ता बांधणीच्या कामाला गती आली आहे. यातून यवतमाळ विभागातील ३५० गावांचे अर्थकारण बदलले आहे.
गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.
पाच वर्षांत यवतमाळ विभागात १६४ किमीचे रस्ते
- यवतमाळ, बाभूळगाव, नेर, घाटंजी या चार तालुक्यांमध्ये गत पाच वर्षांमध्ये १६४ किलोमीटरच्या रस्ता निर्मितीची कामे करण्यात आली आहे.
- पाच वर्षांमध्ये चाैपदरीकरणात २० किलोमीटरची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेली आहे.
- चार तालुक्यातील दुपदरी रस्ता निर्मितीच्या कामाला चांगलाच वेग आला होता. पाच वर्षांमध्ये याठिकाणी १४४ किलोमीटरची कामे झाली आहे.
- यामध्ये रिद्धपूर-तिवसा, धामणगाव-यवतमाळ, बसस्थानक ते वनवासी मारूती हा चाैपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करण्यात आला. तर घाटंजी-पारवा, घाटंजी-पिंपळखुटी, यवतमाळ-बाभूळगाव, अकोलाबाजार-पांढुर्णा, घाटंजी-शिवणी रस्त्याच्या निर्मितीचे काम करण्यात आले.
यवतमाळ तालुक्याला सर्वाधिक लाभ
- यवतमाळ शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्वाधिक रस्त्याची कामे झाली आहे.
- जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येकजण तत्पर आहे. यामुळे रस्त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व्यावसायिकांकडून झाला आहे.
हायब्रीड ॲन्यूटीची कामे निधीअभावी रखडली
- बीओटी तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड ॲन्यूटी प्रकल्प सुरू केला आहे. यातून काही कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे मधातच अडखळली आहे. यातून महामार्गावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दीड तासांचा वेळ आला २५ मिनिटांवर
आर्णी मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील नागरिकांना या रस्त्याचा चांगला उपयोग होत आहे. पूर्वी आर्णीवरून यवतमाळला येण्यासाठी दीड तास लागत होता. आता हा वेळ केवळ २५ ते ३० मिनिटांवर आला आहे.