वणीतील ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:15 PM2018-02-11T22:15:44+5:302018-02-11T22:15:56+5:30
तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणची हेमांडपंथी मंदिरे, किल्ले व गड यांच्या स्मृती देणारे अवशेष केसुर्ली व कवडशीच्या जंगलात आढळणाºया ऐतीहासीक गुहा ह्या इतीहासाची साक्ष देत आहे.
ब्रिटीश राजवटीत ‘वुन’ नावाचा जिल्हा असलेले वणी हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षीत राहिले आहे. तालुक्यातील कायर हे गाव तालुक्याचे ठिकाण होते. या गावात मिळालेले प्राचीन शिलालेख हे महत्त्वाचे ठरले आहे. येथील भुडकेश्वर मंदिर, गावाच्या पश्चिमेस असलेली मातीची किल्लेवजा गढी, तिचे प्रवेशद्वार अजूनही कायम अहे. १८८१ मध्ये येथे पोलीस ठाणे होते. त्याची पडकी इमारत अजूनही उभी आहे. शिरपूर येथे अजूनही उभी असलेली दगड मातीची किल्ल्याची भींत व त्या किल्ल्याच्या आत असलेली पायºयाची विहिर व भूयार हे स्मृतीअवशेष ऐतीहासीक राजवटीची साक्ष देतात. मात्र या स्मृती अवशेषाचे जतन करण्यासाठी शासनाचा पुरातत्व विभाग पुढे सरसावत नाही. आता शिरपूरवासीयांनी गावाला आधुनिकतेची झालर लावून गावाची महती कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
येथील उंच टेकडीवर कैलासाचे व दुर्गादेवीचे मंदिर उभारून गावाच्या महतीला उजाळा दिला आहे. कैलास शिखर मंदिराला तिर्थस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. आता शासनाकडून विकास निधीची अपेक्षा गावकरी करीत आहे. शिरपूरवरून जवळच कवडशी येथे घनदाट वनराई आहे. या वनात चंदनाची झाडे आढळून येतात. उंच टेकडीवर प्राचीन दत्ताचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी तलाव असून हा तलाव कधीही कोरडा पडलेला नाही. तलावाच्या दक्षिणेस जंगलामध्ये ऐतिहासिक गुहा आहेत. येथे दत्त जयंतीला दरवर्षी यात्रा भरते.
वन विभागाने या स्थळाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शासनाने येथील ऐतीहासीक मंदिर व गुहाची दुरूस्ती करून उजेडात आणले, तर हे एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. अशाच प्रकारच्या ऐतीहासीक गुहा केसुर्ली येथील जंगलातदेखिल आहेत. मात्र त्या अजूनही दुर्लक्षीत आहे. पुरातत्व विभागाने या गुहांचा विकास केल्यास या स्थळालाही महत्त्व प्राप्त होऊ शकते. या परिसरातही ३०० एकराची असलेली वनराई नैसर्र्गिक सौंदर्य वाढवत आहे.