डॉक्टरच्या समर्थनार्थ हिवरीचे नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:34 PM2018-11-22T21:34:31+5:302018-11-22T21:34:52+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांचा कारभार अतिशय चांगला आहे. मात्र आरोग्य सेविका एस. एस. पवार कारस्थान रचून त्यांच्या तक्रारी करीत आहेत. याबाबीचा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य गावकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांचा कारभार अतिशय चांगला आहे. मात्र आरोग्य सेविका एस. एस. पवार कारस्थान रचून त्यांच्या तक्रारी करीत आहेत. याबाबीचा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य गावकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. डॉक्टर आमच्या गावासाठी गरजेचे असून आरोग्य सेविकेचीच ताबडतोब हकालपट्टी करा, अशी मागणी लावून धरली.
आरोग्य सेविका पवार यांचा कार्यकाळ वादाचा ठरला आहे. सुरवातीला ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु येथे नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांनी आरोग्य सेविकेसह सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवा देण्याचे आदेश दिले. पण आरोग्य सेविकेने, तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, असे उद्धट उत्तर दिले. त्यामुळे डॉ. राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना याची कल्पना दिली. ही आरोग्यसेविका उपचारासाठी गोरगरिबांना पैशाची मागणी करीत असल्याचा ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा घेण्यात आला आहे. तो जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिला. पण अधिकाºयांनी कोणतेच पाऊल उचलले नाही.
त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संजय शिंदे पाटील यांना बोलावून व्यथा मांडली. डॉक्टर खूपच चांगले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता आरोग्य सेविका, लिपिकाला हिवरी येथून हाकला, अशी विनंती केली. दोन दिवसात हकालपट्टी न केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी दिलीप भगत, पोलीस पाटील दिगांबर शहारे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष वाघाडे, डॉ. विश्वनाथ अलोणे, दीपक धुमाळे, पद्माकर शहारे, विजय शहारे, सुभाष मडावी, अमोल मेहर, अशोक डाके, जीवन मेहर, गौरी विठोबा कोडापे, शशिकला ठोकाडे, मंदा मुनेश्वर, चंदा मेहर, माला भगत, संगीता भगत, लक्ष्मी कुमरे, अलका मानकर, कमला राऊत, गीरजा कुमरे, शेवंता झाडे, चंद्रकला बिलोनकर, सीमा कोडापे, सुशिला मेहर, निर्मला सरोदे, विधाली खंडागळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शैलेश अलोणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.