होळीतील घानमाकड झालीयं नामशेष

By admin | Published: March 14, 2016 02:36 AM2016-03-14T02:36:40+5:302016-03-14T02:36:40+5:30

होळीचा सण जवळ आला की, ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ सुरू होतो.

Holi cemeteries and extinction | होळीतील घानमाकड झालीयं नामशेष

होळीतील घानमाकड झालीयं नामशेष

Next

ग्रामीण खेळ हरविले : चाकोल्या आणि पळस फुलाचा रंगही बेदखल
प्रकाश सातघरे दिग्रस
होळीचा सण जवळ आला की, ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ सुरू होतो. पळसाच्या वक्राकार लाकडापासून तयार केलेली घानमाकड पूर्वी खेड्यापाड्यातील मोकळ्या मैदानावर दिसायची. गोलाकार फिरणाऱ्या आणि कर-कर असा आवाज येणाऱ्या या घानमाकडीबद्दल बालकात विशेष आकर्षण असायचे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बालपणीचे खेळ हरविले आणि घानमाकडही आता नामशेष झाली आहे.
माग महिना संपताच फाल्गून महिन्याची सुरुवात होऊन होळीची चाहूल लागते. होळीच्या एक महिना अगोदरपासूनच तयारी सुरू होते. शेणापासून चाकोल्या तयार केल्या जातात. तसेच गावातील उत्साही मुले घानमाकड तयार करतात. गावालगतच्या जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणले जाते. लाकडाचा ओंडका जमिनीत गाढून त्याला टोक काढले जाते. त्या टोकावर वक्राकार लाकडाला मधोमध कोरुन ठेवले जाते आणि दोनही बाजूला मुलांना बसवून गोलगोल फिरविले जाते. घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जाते. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरविले जाते. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग होतात. आज दुर्गम खेड्यामध्ये घानमाकड दिसत असले तरी शहरीकरणामुळे अनेक खेड्यातून ही घानमाकड आता नामशेष झाली आहे.
२५ ते ३० वर्षापूर्वी हमखास दिसणारी घानमाकड आता दिसतच नाही. बालविश्वाचे सण-संस्कृतीशी नाते जोडणारी ही घानमाकड आता चित्रातच पाहावी लागते. यासोबतच होळीच्या सणापूर्वी लहान मुले शेणापासून चाकोल्या तयार करीत होते. चाकोल्या वाळू घालून त्याची हार बनवून होळीत टाकल्या जात होती. तसेच पळस फुलांपासून परंपरागत रंगही तयार केला जात होता. परंतु आता हा सर्व प्रकार मागे पडला आहे.

Web Title: Holi cemeteries and extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.