प्रस्तावित अॅडव्होकेट विधेयकाची होळी
By admin | Published: April 22, 2017 01:48 AM2017-04-22T01:48:54+5:302017-04-22T01:48:54+5:30
प्रस्तावित अॅडव्होकेट दुरुस्ती विधेयकाला विरोध म्हणून पुसद, महागाव, दिग्रस येथील वकिलांनी या विधेयकाची होळी करून निषेध नोंदविला.
निवेदन : पुसद, महागाव, दिग्रस, उमरखेड येथील वकिलांचा पुढाकार
पुसद : प्रस्तावित अॅडव्होकेट दुरुस्ती विधेयकाला विरोध म्हणून पुसद, महागाव, दिग्रस येथील वकिलांनी या विधेयकाची होळी करून निषेध नोंदविला. तसेच तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या विधेयकानुसार विदेशातील वकीलसुद्धा भारतात वकिली करू शकतात, यालाच भारतीय वकिलांनी विरोध केला आहे. पुसद येथे दुपारी २ वाजता न्यायमंदिरासमोर होळी करण्यात आली. यावेळी बार कॉनसीलचे अध्यक्ष अॅड़ जावेद वर्षाणी, अॅड़ अमोल आसोले, अॅड़ गजानन देशमुख, अॅड़ झेड.ओ. भंडारी, अॅड़ उमाकांत पापीनवार, अॅड़ भारत जाधव, अॅड़ पारेकर, अॅड़ गोडसे, अॅड़ राजू शिंदे, अॅड़ गरड, अॅड़ ज्ञानेद्र कुशवाह, अॅड़ नरसिंग, अॅड़ कैलास राठोड, अॅड़ पवनकुमार जैन यांच्यासह विधीज्ञ उपस्थित होते. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. महागाव येथे अॅड. विवेक देशमुख, खुशाल महागावकर, गजेंद्र देशमुख, जीवन नरसिंग, सुरेश राऊत, गौतम कांबळे, एस.पी. देशमुख, सतीश चाटसे, आर.टी. जाधव, सुनील नरवाडे, जहीर खान, जी.एस. कदम, बी.टी. परेकर, नीलेश वानखेडे, लक्ष्मीकांत भांगे, अनिल येनकर, के.वाय. वानखेडे, टी.एच. मिर्झा, बाबासाहेब नाईक उपस्थित होते. नायब तहसीलदार गजानन कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
दिग्रस येथे अॅड. आर.डी. देशपांडे, आर.बी. राठोड, दत्ता खंडारे, टी.एम. मलनस, व्ही.बी. राठोड, आर.बी. राठोड, प्रवीण ढाले, गणेश दुधे, मोहसीन मिर्झा, विक्रांत शिंदे, अजय पवार, डी.जे. राठोड आदी वकील मंडळी उपस्थित होते. नायब तहसीलदार एस.के. पांडे यांना निवेदन देण्यात आले. उमरखेड येथे वकिलांनी या प्रस्तावित बिलाची होळी केली. तसेच तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी उमरखेड वकिल संघाचे अध्यक्ष अॅड़ मनोज काळेश्वरकर, अॅड़ निरंजन कदम, अॅड़ मनीषा भारती, अॅड़ संजय जाधव, अॅड़ मुडे, अॅड़ पांडे, अॅड़ मुन्नरवार, अॅड़ चौधरी, अॅड़ देव, अॅड़ सूर्यवंशी, अॅड़ पाईकराव, अॅड़ चव्हाण, अॅड़ सिंगणकर, अॅड़ अनिल शिंंदे, अॅड़ तिवारी, अॅड़ चापले, अॅड़ जोशी, अॅड़ कलाणे उपस्थित होते. (लोकमत चमू)