होळी विशेष; शेणाच्या 'चाकोल्या झाल्यात इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 09:32 AM2021-03-28T09:32:20+5:302021-03-28T09:32:47+5:30

Yawatmal news होळी आणि धुळवड इथे जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा.पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहितही नाही.

Holi special; Tradition of dunghills is now part of history | होळी विशेष; शेणाच्या 'चाकोल्या झाल्यात इतिहासजमा

होळी विशेष; शेणाच्या 'चाकोल्या झाल्यात इतिहासजमा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : होळी आणि धुळवड इथे जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा.पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहितही नाही. परंतु यवतमाळच्या दिग्रस सारख्या ग्रामीण भागात आजही ही परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळते.
आजची होळी म्हणजे लाकडे पेटवणे आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळणे इथपर्यंतच मर्यादित आहे. पण पंचवीस -तीस वर्षांपूर्वीची होळी आणि आजच्या होळीला बघता आता बराच फरक पडलेला जाणवतो. होळी लाकडांची असली तरीही घरोघरी तयार केलेला शेणाच्या चाकोल्या होळीच्या पूजेच्या वेळी टाकल्या जायचच्या.

लहान मुले दोन दिवसाआधीपासूनच या चाकोल्या बनवण्याच्या कामाला लागायचे. शेण आणून त्याच्या लहान लहान वेगवेगळ््या आकारांच्या चाकोल्या बनवल्या जायच्या. त्याला माळेत ओवता यावे यासाठी मध्यभागी एक भोकही ठेवले जायचे. त्या पूर्णपणे सुकल्या की त्याची माळ बनवली जायची. आई-बहिणी सोबत लहान मुलं होळीच्या पुजेला जायचे. त्या वेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. आजही या चाकोल्यांचा वापर होळीच्या पुजेच्या वेळी केला जातो. यवतमाळच्या दिग्रस येथील धनवी दातीर, अनुष्का चिरडे, जानवी निचळ, रक्षा जाधव या चिमुकल्यांनी चाकोल्या तयार करत परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेणापासून चाकोल्या करण्याचा आनंद नव्या पिढीला कळणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहेत

Web Title: Holi special; Tradition of dunghills is now part of history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी